lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जबरदस्त! Google Pay ला Tata Pay टक्कर देणार! आरबीआयने दिली परवानगी, लवकरच होणार लाँच

जबरदस्त! Google Pay ला Tata Pay टक्कर देणार! आरबीआयने दिली परवानगी, लवकरच होणार लाँच

Tata Pay ला भारतीय रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी रोजी एग्रीग्रेटर लाईसन्स दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 03:20 PM2024-01-02T15:20:41+5:302024-01-02T15:23:36+5:30

Tata Pay ला भारतीय रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी रोजी एग्रीग्रेटर लाईसन्स दिले आहे.

tata pay gets upi aggregator license rbi google pay razor pay may face competition | जबरदस्त! Google Pay ला Tata Pay टक्कर देणार! आरबीआयने दिली परवानगी, लवकरच होणार लाँच

जबरदस्त! Google Pay ला Tata Pay टक्कर देणार! आरबीआयने दिली परवानगी, लवकरच होणार लाँच

Tata ( Marathi News ) : टाटा समुहाने आता पेमेंट अॅप्लिकेशनमध्ये पाऊल ठेवले आहे. Tata Pay ला आता भारतीय रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एग्रीगेटर परवानाही मिळाला आहे. म्हणजेच आता टाटा कंपनी ई-कॉमर्स व्यवहार करू शकते. टाटा पे टाटा डिजिटलचा भाग आहे, कंपनीची डिजिटल शाखा आहे. याद्वारे कंपनी डिजिटल व्यवसाय करते. यामुळे आता आपल्याला गुगल पे सारखीच टाटा पे ही वापरता येणार आहे. 

पहिल्याच दिवशी सात खुशखबरी! देशाच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरुच

टाटा समुहाने २०२२ मध्येच आपल्या डिजीटवर अॅप्लिकेशनवर काम करत होती. आतापर्यंत कंपनीने ICICI बँकेसोबत भागीदारी करून UPI ​​पेमेंट केली होती. यासोबतच कंपनी तंत्रज्ञानाबाबत नवीन रणनीती बनवत आहे. कारण आत्तापर्यंत कंपनीचा ग्राहकांशी कोणताही संबंध नाही. टाटा समूहाचा हा दुसरा पेमेंट व्यवसाय आहे जो कंपनी वापरणार आहे. कंपनीकडे ग्रामीण भारतात 'White Label ATM' चालवण्याचा परवाना आहे. कंपनीने या बिझनेसला  Indicash असं नाव दिले आहे.

टाटाने याआधी प्रीपेड पेमेंट व्यवसायात काम केले आहे. पण प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर कंपनीने २०१८ मध्ये आपला परवाना सरेंडर केला. डिजिटल पेमेंट्स स्टार्टअपचे संस्थापक म्हणाले, 'पेमेंट एग्रीगेटर लाइटसह, टाटा सब्सिडियरी संस्थांसोबत सर्व ईकॉमर्स व्यवहार करू शकते आणि यामुळे निधी व्यवस्थापित करण्यातही खूप मदत होईल.

Razorpay, Cashfree, Google Pay आणि इतर कंपन्यांप्रमाणे, Tata Pay ला देखील दीर्घ प्रतीक्षेनंतर परवाना मिळाला आहे. पीए लायसन्सच्या मदतीने, कंपनीला ऑनलाइन व्यवहार करण्याची परवानगी आहे. यासह, कंपनी निधी हाताळण्याची परवानगी देखील देते. टाटा पे व्यतिरिक्त, बेंगळुरूस्थित डिजीओला १ जानेवारी रोजी परवाना मिळाला.

Web Title: tata pay gets upi aggregator license rbi google pay razor pay may face competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.