Union Budget
Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा मोटर्सची अर्थमंत्र्यांकडे मोठी मागणी! अर्थसंकल्पात स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार? जाणून घ्या सविस्तर

टाटा मोटर्सची अर्थमंत्र्यांकडे मोठी मागणी! अर्थसंकल्पात स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार? जाणून घ्या सविस्तर

Budget 2026, Tata Motors Demand: अर्थसंकल्प २०२६ पूर्वी टाटा मोटर्सने एन्ट्री-लेव्हल ईव्हीसाठी सवलतींची मागणी केली आहे. पीएम ई-ड्राइव्ह योजना आणि गाड्यांच्या वाढत्या किमतींबाबत शैलेश चंद्रा यांनी दिलेली माहिती वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 09:55 IST2026-01-20T09:54:32+5:302026-01-20T09:55:59+5:30

Budget 2026, Tata Motors Demand: अर्थसंकल्प २०२६ पूर्वी टाटा मोटर्सने एन्ट्री-लेव्हल ईव्हीसाठी सवलतींची मागणी केली आहे. पीएम ई-ड्राइव्ह योजना आणि गाड्यांच्या वाढत्या किमतींबाबत शैलेश चंद्रा यांनी दिलेली माहिती वाचा.

Tata Motors' big demand to the Finance Minister! Will electric cars be cheaper in the budget? Know the details | टाटा मोटर्सची अर्थमंत्र्यांकडे मोठी मागणी! अर्थसंकल्पात स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार? जाणून घ्या सविस्तर

टाटा मोटर्सची अर्थमंत्र्यांकडे मोठी मागणी! अर्थसंकल्पात स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सने केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. प्रामुख्याने एन्ट्री-लेव्हल (कमी किमतीच्या) इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी विशेष सवलतींची मागणी करण्यात आली आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, गेल्या काही काळातील जीएसटी सुधारणांमुळे पेट्रोल कारच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे स्वस्त इलेक्ट्रिक कारवर दबाव वाढला आहे. ग्राहकांना ईव्ही अधिक परवडणारी वाटावी यासाठी अर्थसंकल्पात विशेष सवलती मिळणे आवश्यक आहे.

सध्याच्या 'पीएम ई-ड्राइव्ह' योजनेत व्यावसायिक वापराच्या इलेक्ट्रिक कारचा समावेश नाही. टाटा मोटर्सने मागणी केली आहे की, टॅक्सी म्हणून वापरल्या जाणाऱ्या ईव्ही गाड्यांनाही या योजनेत स्थान मिळावे. या गाड्या खासगी गाड्यांच्या तुलनेत ५ पट जास्त धावतात, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिल्यास प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल.

किमती कमी होणार की वाढणार?
एकीकडे स्वस्त ईव्हीची मागणी होत असतानाच, दुसरीकडे टाटा मोटर्सने किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि परकीय चलन दरातील चढउतार यामुळे कंपनीच्या मार्जिनवर २% पर्यंत परिणाम झाला आहे. हा बोजा अद्याप ग्राहकांवर टाकलेला नाही, मात्र लवकरच गाड्यांच्या किमती वाढवण्याबाबत कंपनी निर्णय घेऊ शकते.

Web Title : टाटा मोटर्स ने सस्ती इलेक्ट्रिक कारों के लिए कर राहत मांगी।

Web Summary : टाटा मोटर्स ने आगामी बजट में एंट्री-लेवल ईवी को प्रोत्साहन देने का आग्रह किया, जीएसटी के प्रभाव का हवाला दिया। उन्होंने 'पीएम ई-ड्राइव' योजना में वाणिज्यिक ईवी को शामिल करने का भी अनुरोध किया। कच्चे माल की बढ़ती लागत से सभी मॉडलों की कीमतें बढ़ सकती हैं।

Web Title : Tata Motors seeks tax relief for affordable electric cars.

Web Summary : Tata Motors urges the government to incentivize entry-level EVs in the upcoming budget, citing GST's impact. They also request inclusion of commercial EVs in the 'PM e-Drive' scheme to boost adoption. Rising raw material costs may lead to price hikes for all models.