Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्विगीचे १० मिनिटांत डिलिव्हरी 'अॅप' बंद! झटपट फूड डिलिव्हरीचा प्रयोग फसला; कर्मचाऱ्यांचे काय होणार?

स्विगीचे १० मिनिटांत डिलिव्हरी 'अॅप' बंद! झटपट फूड डिलिव्हरीचा प्रयोग फसला; कर्मचाऱ्यांचे काय होणार?

Swiggy Snacc : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने त्यांचे सिग्नेचर अ‍ॅप, स्नॅक, बंद केले आहे, जे १० मिनिटांत अन्न पोहोचवत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:16 IST2026-02-20T15:49:30+5:302026-02-20T16:16:39+5:30

Swiggy Snacc : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने त्यांचे सिग्नेचर अ‍ॅप, स्नॅक, बंद केले आहे, जे १० मिनिटांत अन्न पोहोचवत होते.

Swiggy Shuts Down Snacc 10-Minute Food Delivery App Closed Due to Rising Losses | स्विगीचे १० मिनिटांत डिलिव्हरी 'अॅप' बंद! झटपट फूड डिलिव्हरीचा प्रयोग फसला; कर्मचाऱ्यांचे काय होणार?

स्विगीचे १० मिनिटांत डिलिव्हरी 'अॅप' बंद! झटपट फूड डिलिव्हरीचा प्रयोग फसला; कर्मचाऱ्यांचे काय होणार?

Swiggy Snacc : नवनवीन प्रयोगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'स्विगी' या फूडटेक दिग्गज कंपनीने आपला १० मिनिटांत फूड डिलिव्हरी देणारा 'स्नॅक' हा अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू असलेल्या या व्यवसायात नफा मिळवणे कठीण जात असल्याचे स्पष्ट करत कंपनीने यावर पडदा टाकला आहे.

तोट्याचे गणित आणि वाढती स्पर्धा
स्विगीने जानेवारी २०२५ मध्ये बेंगळुरू आणि गुरुग्राममध्ये 'Snacc' लाँच केले होते. याद्वारे नाश्ता, कॉफी, बेकरी उत्पादने आणि शीतपेये अवघ्या १० मिनिटांत पोहोचवण्याचा दावा केला जात असे. कंपनीने अंतर्गत ई-मेलमध्ये स्पष्ट केले आहे की, या मॉडेलमध्ये प्रत्येक ऑर्डरमागे नफा कमवणे आव्हानात्मक ठरत होते. झोमॅटोच्या मालकीच्या 'ब्लिंकिट बिस्ट्रो'ला गेल्या ९ महिन्यांत सुमारे १५० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तर 'झेप्टो कॅफे' देखील या स्पर्धेत आहे.

स्विगीच्या तोट्यात ३३ टक्क्यांची वाढ
स्नॅक बंद करण्याच्या निर्णयामागे स्विगीची खालावलेली आर्थिक स्थिती हे मुख्य कारण मानले जात आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा वार्षिक आधारवर ३३ टक्क्यांनी वाढून १,०६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा तोटा ७९९ कोटी रुपये होता.

'१० मिनिटे डिलिव्हरी' आणि सुरक्षेचा मुद्दा
केंद्र सरकारने काही आठवड्यांपूर्वीच क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मला १० मिनिटांच्या डिलिव्हरीची डेडलाईन हटवण्याचे निर्देश दिले होते. ही वेगवान डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी डिलिव्हरी बॉईजचा जीव धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. ३१ डिसेंबर रोजी गिग वर्कर्स युनियनने देशव्यापी संप पुकारून आपल्या हक्कांची मागणी केली होती.

वाचा - पगार पुरत नाही? मग आजच 'हा' ५०-३०-२० फॉर्म्युला वापरा; पैशांचे टेन्शन कायमचे मिटेल

कर्मचाऱ्यांचे काय होणार?
स्नॅक बंद झाल्यामुळे प्रभावित होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत स्विगीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. पुढील ४८ तासांत या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या इतर विभागांमध्ये सामावून घेतले जाईल आणि त्यांना आवश्यक तो 'ट्रान्झिशन सपोर्ट' दिला जाईल, असे ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title : स्विगी ने नुकसान और प्रतिस्पर्धा के बीच 10 मिनट की डिलीवरी ऐप बंद की

Web Summary : स्विगी ने लाभ न होने और बढ़ती प्रतिस्पर्धा के कारण अपनी 'स्नैक' 10 मिनट की डिलीवरी ऐप बंद कर दी। कर्मचारियों को अन्य विभागों में भेजा जाएगा। यह कदम स्विगी के लिए भारी नुकसान और डिलीवरी सुरक्षा संबंधी चिंताओं के बाद उठाया गया है।

Web Title : Swiggy Shuts Down 10-Minute Delivery App Amid Losses, Competition

Web Summary : Swiggy discontinues its 'Snacc' 10-minute delivery app due to unprofitability and rising competition. The move, impacting employees who will be reassigned, follows significant losses for Swiggy and concerns about delivery safety.