Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > झोमॅटोपाठोपाठ स्विगीचाही झटका! 'प्लॅटफॉर्म फी'मध्ये मोठी वाढ; आता ऑनलाईन जेवण मागवणे होणार अधिक महाग

झोमॅटोपाठोपाठ स्विगीचाही झटका! 'प्लॅटफॉर्म फी'मध्ये मोठी वाढ; आता ऑनलाईन जेवण मागवणे होणार अधिक महाग

Swiggy Platform Fee : स्विगीवरून जेवण मागवण्यासाठी आता तुम्हाला अधिकचे 'प्लॅटफॉर्म शुल्क' मोजावे लागेल. यापूर्वी झोमॅटोनेही आपल्या शुल्कात वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:51 IST2026-03-24T14:49:00+5:302026-03-24T15:51:48+5:30

Swiggy Platform Fee : स्विगीवरून जेवण मागवण्यासाठी आता तुम्हाला अधिकचे 'प्लॅटफॉर्म शुल्क' मोजावे लागेल. यापूर्वी झोमॅटोनेही आपल्या शुल्कात वाढ केली आहे.

Swiggy Increases Platform Fee to ₹17.58 per Order: Online Food Delivery Gets Costlier | झोमॅटोपाठोपाठ स्विगीचाही झटका! 'प्लॅटफॉर्म फी'मध्ये मोठी वाढ; आता ऑनलाईन जेवण मागवणे होणार अधिक महाग

झोमॅटोपाठोपाठ स्विगीचाही झटका! 'प्लॅटफॉर्म फी'मध्ये मोठी वाढ; आता ऑनलाईन जेवण मागवणे होणार अधिक महाग

Swiggy Platform Fee : जर तुम्ही हॉटेलमध्ये जाण्याऐवजी घरबसल्या ऑनलाईन जेवण मागवण्यास पसंती देत असाल, तर आता तुमच्या खिशाला जास्त कात्री लागणार आहे. आघाडीची ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपली 'प्लॅटफॉर्म फी' वाढवल्यानंतर, आता तिची प्रतिस्पर्धी कंपनी स्विगीने देखील शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नव्या निर्णयानुसार, स्विगीवरून प्रत्येक ऑर्डरमागे आता ग्राहकांना १७.५८ रुपये मोजावे लागणार आहेत.

स्विगी आणि झोमॅटो: शुल्काची नवी गणिते
गेल्या काही दिवसांत दोन्ही कंपन्यांनी आपल्या शुल्कात सुधारणा केली आहे. यामुळे ग्राहकांच्या एकूण बिलात वाढ झाली आहे.

कंपनी जुने शुल्क (प्रति ऑर्डर) नवीन शुल्क (प्रति ऑर्डर) वाढ (टक्केवारी) 
स्विगी १४.९९ १७.५८ सुमारे १७.२८% 
झोमॅटो १२.५० १४.९० सुमारे १९.२०% 

कोणाला बसणार सर्वाधिक फटका?

  • प्लॅटफॉर्म फीमधील या वाढीचा सर्वाधिक परिणाम नियमितपणे ऑनलाईन जेवण मागवणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. 
  • शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहणारे तरुण, जे दररोज ऑनलाईन फूड ॲप्सवर अवलंबून असतात, त्यांच्या मासिक खर्चात यामुळे मोठी वाढ होणार आहे. 
  • ही फी प्रत्येक ऑर्डरसाठी वेगळी आकारली जाते. त्यामुळे तुम्ही दिवसातून दोनदा जेवण मागवले, तर तुम्हाला दोनदा हे वाढीव शुल्क द्यावे लागेल.

वाचा - पगारदारांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून 'फॉर्म १६' बंद; करदात्यांसाठी येणार 'फॉर्म १३०', फायदे-तोटे समजून घ्या

शुल्क वाढवण्यामागे 'हे' आहे कारण
कंपन्यांच्या मते, प्लॅटफॉर्म चालवण्यासाठी लागणारा खर्च आणि त्याचे मेंटेनन्स करण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये या कंपन्या केवळ २ रुपये प्लॅटफॉर्म फी आकारत होत्या. मात्र, गेल्या तीन वर्षांत यात सातत्याने वाढ करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये स्विगीने हे शुल्क १२ रुपयांवरून १४ रुपये केले होते, तर सप्टेंबर २०२५ मध्ये ते १४.९९ रुपयांपर्यंत नेले होते. आता मार्च २०२६ मध्ये यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
 

Web Title : स्विगी ने बढ़ाया प्लेटफॉर्म शुल्क: ऑनलाइन खाना ऑर्डर करना हुआ महंगा

Web Summary : ज़ोमैटो के बाद, स्विगी ने भी अपना प्लेटफॉर्म शुल्क बढ़ाया, जिससे ऑनलाइन खाना ऑर्डर करना महंगा हो गया है। स्विगी का शुल्क बढ़कर ₹17.58 प्रति ऑर्डर हो गया है, जिससे नियमित ऑनलाइन खाना खाने वाले ग्राहक प्रभावित होंगे, खासकर वे युवा जो घर से दूर रहते हैं। कंपनियों ने बढ़ी हुई शुल्क के लिए रखरखाव लागत का हवाला दिया है, जो 2023 में ₹2 से काफी अधिक है।

Web Title : Swiggy Hikes Platform Fee: Online Food Orders Get More Expensive

Web Summary : Following Zomato, Swiggy also increased its platform fee, making online food orders costlier. Swiggy's fee rises to ₹17.58 per order, impacting regular online food consumers, especially young people living away from home. Companies cite maintenance costs for the increased charges, a significant jump from ₹2 in 2023.