Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा

३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा

Swan Defence Share Price: देशातील पहिल्या अमोनिया जहाजाची ऑर्डर कंपनीला मिळाल्यानंतर ही तेजी दिसून आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:25 IST2026-04-07T15:25:40+5:302026-04-07T15:25:40+5:30

Swan Defence Share Price: देशातील पहिल्या अमोनिया जहाजाची ऑर्डर कंपनीला मिळाल्यानंतर ही तेजी दिसून आली आहे.

Swan Defence Shares Hit Upper Circuit on Receiving ₹3,000 Crore Order for Ammonia-Fuel Carriers | ३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा

३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा

Swan Defence Share Price : शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ-उतारात संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज' सध्या प्रकाशझोतात आली आहे. भारताचे पहिले 'अमोनिया ड्युअल-फ्युएल बल्क कॅरिअर' तयार करण्याचे ऐतिहासिक कंत्राट या कंपनीला मिळाले आहे. या बातमीमुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर स्वान डिफेन्सचा शेअर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह १,७९१.४० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.

ऊर्जा क्षेत्रातील 'एनर्जी वन'कडून ४ मोठ्या जहाजांची ऑर्डर
स्वान डिफेन्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला 'एनर्जी वन लिमिटेड'कडून चार भव्य जहाजे बांधण्याचे कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटाचे मूल्य १,५०१ कोटी ते ३,००० कोटी रुपयांच्या दरम्यान असणार आहे. ही जहाजे ९२,५०० डेडवेट टनेज क्षमतेची असतील. ही जहाजे 'अमोनिया' या भविष्यातील सर्वात स्वच्छ समुद्री इंधनावर चालणारी असतील.

दक्षिण कोरियाची साथ आणि जागतिक दर्जा
या जहाजांची लांबी २२९.५ मीटर आणि रुंदी ३७ मीटर असणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी KMS-EMEC डिझाईन तयार करत आहे. या जहाजांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'डेट नोर्स्के वेरिटास' कडून प्रमाणीकरण मिळणार आहे. कंपनीचे संचालक विवेक मर्चंट यांच्या मते, या ऑर्डरमुळे जागतिक स्तरावर भारतीय जहाजबांधणी आणि विशेषतः 'पीपावाव' शिपयार्डच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

'मल्टीबॅगर' परतावा देणारा स्टॉक

  • गुंतवणूकदारांसाठी हा शेअर खऱ्या अर्थाने सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरला आहे.
  • एका वर्षातील परतावा : तब्बल १,७७०% (छप्परफाड परतावा).
  • साप्ताहिक तेजी : गेल्या एका आठवड्यात या शेअरने १२% वाढ नोंदवली आहे, तर याच काळात निफ्टी-५० मध्ये केवळ ३% वाढ झाली.
  • २०२६ मधील कामगिरी : वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हा शेअर २२ टक्क्यांनी वधारला आहे.

वाचा - ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)


  •  

Web Title : ₹3,000 करोड़ का ठेका मिलते ही स्वान डिफेंस के शेयर 5% चढ़े

Web Summary : स्वान डिफेंस को एनर्जी वन से ₹3,000 करोड़ का अमोनिया ईंधन जहाजों का ठेका मिला, जिससे शेयर 5% चढ़े। चार जहाजों का यह सौदा कोरियाई डिजाइन और अंतरराष्ट्रीय प्रमाणन पर आधारित है, जिससे निवेशकों का विश्वास बढ़ा है। शेयर ने एक साल में 1770% रिटर्न दिया है।

Web Title : Swan Defence Soars 5% on ₹3,000 Crore Contract Win

Web Summary : Swan Defence shares jumped 5% after securing a ₹3,000 crore contract to build ammonia dual-fuel bulk carriers for Energy One. The deal, involving four 92,500 DWT vessels, uses Korean design and international certification, boosting investor confidence. The stock has delivered 1770% returns in a year.