lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹390 वरून थेट ₹7 वर आला हा शेअर! पण कंपनीने एक घोषणा केली अन् दिवसभरातच 14% वाढली किंमत

₹390 वरून थेट ₹7 वर आला हा शेअर! पण कंपनीने एक घोषणा केली अन् दिवसभरातच 14% वाढली किंमत

1 लाखाचे झाले 1700 रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:01 PM2023-03-29T21:01:58+5:302023-03-29T21:02:56+5:30

1 लाखाचे झाले 1700 रुपये...

suzlon energy ltd share came directly from ₹390 to ₹7 But the company made an announcement and the price increased by 14% within the day | ₹390 वरून थेट ₹7 वर आला हा शेअर! पण कंपनीने एक घोषणा केली अन् दिवसभरातच 14% वाढली किंमत

₹390 वरून थेट ₹7 वर आला हा शेअर! पण कंपनीने एक घोषणा केली अन् दिवसभरातच 14% वाढली किंमत

शेअर बाजारात आज एका एनर्जी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. हा शेअर सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा आहे. कंपनीचा शेअर आज बुधवारी 14.73 टक्क्यांपर्यंत वधारला आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचा शेअर 8.10 रुपयांवर पोहोचला. मात्र, तो 7.95 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एका घोषणेनंतर आली आहे. खरेतर, सुझलॉन एनर्जीने, आपण राइट्स इश्यू अंतर्गत थकबाकी असलेले शेअरचे पैसे भरले असल्याचे बीएसईला कळवले आहे.

काय म्हणाली कंपनी? -
सुझलॉन एनर्जीने बीएसईला कळवले आहे की, त्यांनी 2.50 रुपये प्रति इक्विटी शेअरवर 240,00,00,000 शेअरसह 1 रुपये अधिक भरले आहेत. हे शेअर्स राइट्स इश्यू अंतर्गत 31 ऑक्टोबर 2022 ला वाटण्यात आले होते. याशिवाय, कंपनीने स्वतंत्र संचालक गौतम दोशी यांची तीन वर्षांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली आहे.

पंधरा वर्षांत 97 टक्क्यांनी आपटला शेअर -
बीएसईच्या आकडेवारीनुसार, गेल्या 15 वर्षांत हा स्टॉक तब्बल 97% पर्यंत घसरला आहे. या काळात स्टॉकची किंमत ₹ 390 (11 जानेवारी 2008 ची किंमत) वरून सध्याच्या किंमतीवर आली आहे. अर्थात पंधरा वर्षांत एक लाखाचे केवळ 1700 रुपयेच उरले आहेत. या वर्षी YTD मध्ये हा स्टॉक 25.84% घसरला आहे. गेल्या एका वर्षात त्यात 7% ने घट झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: suzlon energy ltd share came directly from ₹390 to ₹7 But the company made an announcement and the price increased by 14% within the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.