Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुपर धमाका ऑफर, 'या' कंपनीकडून केवळ 35 रुपयात 5 जीबी डेटा मिळणार

सुपर धमाका ऑफर, 'या' कंपनीकडून केवळ 35 रुपयात 5 जीबी डेटा मिळणार

कंपनीने या प्लानमधला डेटा वाढवला असला तरी प्लानच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:20 IST2019-04-24T16:20:09+5:302019-04-24T16:20:59+5:30

कंपनीने या प्लानमधला डेटा वाढवला असला तरी प्लानच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आला नाही.

Super Explosion Offer, BSNL company will get 5 GB data for only 35 rupees | सुपर धमाका ऑफर, 'या' कंपनीकडून केवळ 35 रुपयात 5 जीबी डेटा मिळणार

सुपर धमाका ऑफर, 'या' कंपनीकडून केवळ 35 रुपयात 5 जीबी डेटा मिळणार

नवी दिल्ली - बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट प्लॅन बाजारात आणला आहे. BSNL च्या ग्राहकांना आतापर्यंत 35 रुपयांच्या प्लानमध्ये 200 एमबी डेटा वापरायला मिळत होता. मात्र, नवीन प्लाननुसार तब्बल 5 जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळणार आहे. म्हणजेच, पूर्वीपेक्षा 25 पट अधिक जास्त डेटा ग्राहकांना दररोज मिळणार आहे.

कंपनीने या प्लानमधला डेटा वाढवला असला तरी प्लानच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे प्लानची वैधता ही 5 दिवसांचीच असणार आहे. त्यामुळे 35 रुपयांत 5 जीबी डेटा म्हणजेच दररोज एक जीबी डेटा ग्राहकाला वापरता येईल. 

BSNL कडून काही नवे प्लान जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, 53 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्येही कंपनीने बदल केला असून या प्लाननुसार आता 250 एमबी डेटाऐवजी युजर्सना तब्बल 8 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र, या प्लानची वैधता 21 दिवसांऐवजी 14 दिवसच असेल. 

अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा
395 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग (मुंबई व दिल्ली वगळता) मिळेल. तसेच युजर्संना दैनिक 2 जीबी डेटा मिळेल. या प्लानची वैधता 71 दिवसांची आहे.
 

Web Title: Super Explosion Offer, BSNL company will get 5 GB data for only 35 rupees