Lokmat Money > बिझनेस न्यूज > इडली-डोसा विकून उभारलं २००० कोटींचं साम्राज्य; वाचा पीसी मुस्तफा यांची संघर्षगाथा! 

इडली-डोसा विकून उभारलं २००० कोटींचं साम्राज्य; वाचा पीसी मुस्तफा यांची संघर्षगाथा! 

परिस्थितीशी दोन हात करत जिद्दीच्या जोरावर यशला गवसणी घालणाऱ्या उद्योजकाची कहाणी ... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 05:38 PM2023-12-13T17:38:56+5:302023-12-13T17:41:06+5:30

परिस्थितीशी दोन हात करत जिद्दीच्या जोरावर यशला गवसणी घालणाऱ्या उद्योजकाची कहाणी ... 

Success Story of pc musta the man who built 2000 cr dosa and idli startup company name fresh food private limited  | इडली-डोसा विकून उभारलं २००० कोटींचं साम्राज्य; वाचा पीसी मुस्तफा यांची संघर्षगाथा! 

इडली-डोसा विकून उभारलं २००० कोटींचं साम्राज्य; वाचा पीसी मुस्तफा यांची संघर्षगाथा! 

Sucess Story: मेहनत करणाऱ्याला कधीही मरण नसते असं म्हटलं जातं. जिद्द आणि परिस्थितीशी लढण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असेल तर यश मिळतंच. असंच एक उदाहरण उद्योग जगतातून समोर आलं आहे. संकटावर मात करत आज २ हजार कोटींच्या कंपनीचे मालक असलेले पीसी मुस्तफा या उद्योजकाची संघर्षगाथा आपण जाणून घेणार आहोत. 

पीसी मुस्तफा यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती फार बेताची होती. दारिद्रय जणू पाचवीलाच पुजलेलं. एक वेळच्या जेवणाची भ्रांत होती. अशा कठीण प्रसंगांना तोंड देत पीसी मुस्तफा यांनी उद्योगक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना शिक्षणसुद्धा घेता आलं नाही. असं असतानाही आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. काही काळ एक कंपननीत नोकरी केली पण त्यातही त्यांचं मन रमलं नाही. काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं स्वप्न त्यांना झोपू देत नव्हतं. 

एक मिक्सर ग्राइंडर आणि सेकंड हॅंड दुचाकीच्या मदतीनं मुस्तफा यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. इडली-डोशाची विक्री करत नव्या व्यवसायात त्यांनी पाऊल ठेवलं. कालांतरानं या व्यवासायाची व्याप्ती वाढल्यानंतर त्याचं रुपांतर मोठ्या कंपनीत करण्यात आलं. आजच्या घडीला पीसी मुस्तफा 'फ्रेश फुड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' नावाच्या कंपनीचे मालक आहेत. 

नोकरीकडे फिरवली पाठ :

स्वत: चा व्यवसाय करण्याची इच्छा उराशी बाळगून पीसी मुस्तफा भारतात परतले. दुबई सिटी बँकेच्या नोकरीवर पाणी सोडून त्यांनी मायदेशी परतण्याचा मार्ग स्विकारला. दिवसाला साधारणत: १०० फूड पॅकेट्सची विक्री करत त्यांनी व्यवसाय केला. सुरूवात जरी धिम्या गतीने झाली तरी कालांतराने ग्राहकांसोबतच व्यवासायामध्येही वृद्धी झाली.

उत्पादनात वाढ केली  :

जसजशी ग्राहकांच्या संख्येत वाढ होऊ लागली, त्यानुसार मुस्तफा यांनी जमीन खरेदी करून ५५० फूटच्या कंपनी सुरू केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची मागणी वाढली. १०० फूड पॅकेट्सवरून २ हजार इतक्या फूड पॅकेट्सची मागणी वाढू लागली. फक्त इडली-डोसा इतकाच व्यवसाय मर्यादित न ठेवता त्यांनी मालाबार पराठा तसेच चपाती या पदार्थांचा व्यवसायात समावेश केला. 

२ हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं :

अपार मेहनतीच्या जोरावर मुस्तफा यांची उत्पादनं त्या ठिकाणी पोहोचली जिथं त्यांनी उमेदीच्या काळात नोकरी केली होती. हेलियन वेंचर्स या परदेशी कंपनीनं 'फ्रेश फूड -इंडिया'वर विश्वास दर्शवला आणि या कंपनीमध्ये ३५ कोटींची गुंतवणूक केली. नुकताच २०२३ मध्ये या पीसी मुस्तफा यांच्या कंपनीने ५०० कोटींचा टर्नओव्हर नोंदवला. आज मुस्तफा २ हजार कोटींच्या कंपनीचे मालक बनले आहेत. मुस्तफा यांच्या कंपनीमुळे बंगळूरू, चेन्नई तसेच केरळमधील नागरिकांना रोजगार मिळाला आहे.

Web Title: Success Story of pc musta the man who built 2000 cr dosa and idli startup company name fresh food private limited 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.