Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Success Story: आठवीनंतर शाळा सोडली, १६ वर्षी बनवलं App; आता २५ व्या वर्षी हर्षितानं अमेरिकेत केली कमाल

Success Story: आठवीनंतर शाळा सोडली, १६ वर्षी बनवलं App; आता २५ व्या वर्षी हर्षितानं अमेरिकेत केली कमाल

Success Story: जर तुमच्याकडे जिद्द असेल, तर तुम्ही कोणतंही शिखर सहज गाठू शकता, हे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील हर्षिता अरोरा हिने सिद्ध करून दाखवलंय. पाहा कसा होता तिचा प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:04 IST2026-04-09T11:02:40+5:302026-04-09T11:04:00+5:30

Success Story: जर तुमच्याकडे जिद्द असेल, तर तुम्ही कोणतंही शिखर सहज गाठू शकता, हे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील हर्षिता अरोरा हिने सिद्ध करून दाखवलंय. पाहा कसा होता तिचा प्रवास?

success story of harshita arora first youngest partner in Startup Accelerator Y Combinator | Success Story: आठवीनंतर शाळा सोडली, १६ वर्षी बनवलं App; आता २५ व्या वर्षी हर्षितानं अमेरिकेत केली कमाल

Success Story: आठवीनंतर शाळा सोडली, १६ वर्षी बनवलं App; आता २५ व्या वर्षी हर्षितानं अमेरिकेत केली कमाल

Success Story: जर तुमच्याकडे जिद्द असेल, तर तुम्ही कोणतंही शिखर सहज गाठू शकता, हे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील हर्षिता अरोरा हिने सिद्ध करून दाखवलंय. आठवी नंतरच शाळेला रामराम ठोकणारी हर्षिता आता जगातील सर्वात प्रतिष्ठित स्टार्टअप एक्सलेरेटर 'वाय काँबिनेटर' (Y Combinator) मध्ये जनरल पार्टनर बनली आहे. वाय काँबिनेटरच्या इतिहासात ती सर्वात तरुण जनरल पार्टनर ठरली आहे.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हर्षिताने ते शिखर गाठलंय, जिथे पोहोचण्यासाठी अनुभवी व्हेंचर कॅपिटलिस्ट दशकांनुदशके संघर्ष करतात. हर्षिताचे वडील रवींद्र सिंह अरोरा हे ऑटो फायनान्सर आहेत आणि आई जसविंदर कौर गृहिणी आहेत. हर्षितानं आठवीपर्यंतचे शिक्षण पाइनवुड स्कूलमधून घेतले, मात्र तिचे मन पुस्तकांपेक्षा कम्प्युटर कोडिंगमध्ये जास्त रमत होतं. वयाच्या १३ व्या वर्षी तिने कोडिंग आत्मसात केले आणि १५ व्या वर्षी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला.

बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?

१६ व्या वर्षी बनवलं जगप्रसिद्ध ॲप

हर्षिताला पहिले मोठे यश जानेवारी २०१८ मध्ये मिळाले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने एक 'क्रिप्टो पोर्टफोलिओ ट्रॅकर ॲप' तयार केलं, जे ३२ देशांतील १००० हून अधिक क्रिप्टोकरन्सीचे लाईव्ह अपडेट्स देत होतं. लाँच झाल्यानंतर एका महिन्याच्या आत हे ॲप 'Apple App Store' मधील सर्वाधिक मागणी असलेल्या पेड ॲप्सच्या यादीत सामील झालं. या कामगिरीसाठी तिला भारताचा प्रतिष्ठित ‘बाल शक्ती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं.

यानंतर हर्षितानं अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. तिला प्रतिष्ठित 'O-1' व्हिसा मिळाला आणि ती सॅन फ्रान्सिस्कोला गेली. तिने वाय काँबिनेटरसाठी अर्ज केला, परंतु कोविडमुळे तिचा पहिली स्टार्टअप आयडिया अवघ्या तीन आठवड्यांत अयशस्वी झाली.

उभी केली ६३०० कोटींची कंपनी

हर्षितानं कॅलिफोर्नियातील ट्रक स्टॉप्सवर अनेक आठवडे घालवले. तिने ट्रक ड्रायव्हर्सशी संवाद साधला आणि तिला समजलं की, अब्जावधी डॉलर्सची ही इंडस्ट्री आजही १९९० च्या जुन्या तंत्रज्ञानावर आणि फसव्या पेमेंट सिस्टमवर चालत आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तिने 'AtoB' ची स्थापना केली. या कंपनीला ‘ट्रकिंग इंडस्ट्रीचा स्ट्राइप’ (Stripe of the trucking industry) म्हटलं जातं. तिने एक आधुनिक 'फ्यूल कार्ड' तयार केलं, ज्यानं पेमेंट प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी केली.

आज 'AtoB' ही एक 'Series C' कंपनी असून तिचे मूल्यांकन सुमारे ७५० मिलियन डॉलर्स (सुमारे ६,३०० कोटी रुपये) आहे. ही कंपनी अमेरिकेतील ३०,००० पेक्षा जास्त फ्लीट मालकांना आपली सेवा देत आहे.

Web Title : स्कूल छोड़ने से टेक स्टार: हर्षिता का अमेरिकी सपना हुआ साकार

Web Summary : स्कूल छोड़ने वाली हर्षिता अरोड़ा ने सिलिकॉन वैली में सफलता पाई। 16 साल की उम्र में, उन्होंने एक सफल क्रिप्टो ऐप बनाया और बाद में AtoB की स्थापना की, जिसका मूल्य अब $750 मिलियन है। अब, वह Y Combinator में सबसे कम उम्र की जनरल पार्टनर हैं।

Web Title : From Dropout to Tech Star: Harshita's American Dream Realized

Web Summary : Harshita Arora, a school dropout, conquered Silicon Valley. At 16, she created a successful crypto app and later founded AtoB, a trucking industry solution now valued at $750 million. Now, she is the youngest general partner at Y Combinator.