Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर निर्देशांकांनी गाठली नवीन उंची

शेअर निर्देशांकांनी गाठली नवीन उंची

मागील सप्ताहात बाजारात झालेल्या घसरणीनंतर भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे आशादायक पतधोरण, उशिराने का होईना पण मान्सूनने सुरू केलेली दमदार वाटचाल

By admin | Updated: June 9, 2014 04:34 IST2014-06-09T04:34:30+5:302014-06-09T04:34:30+5:30

मागील सप्ताहात बाजारात झालेल्या घसरणीनंतर भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे आशादायक पतधोरण, उशिराने का होईना पण मान्सूनने सुरू केलेली दमदार वाटचाल

Stocks reached new heights | शेअर निर्देशांकांनी गाठली नवीन उंची

शेअर निर्देशांकांनी गाठली नवीन उंची

मागील सप्ताहात बाजारात झालेल्या घसरणीनंतर भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे आशादायक पतधोरण, उशिराने का होईना पण मान्सूनने सुरू केलेली दमदार वाटचाल, परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी यामुळे बाजारात जोरदार तेजी आली. त्यामुळे बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. या बरोबरच पीएमआयमध्ये झालेली वाढ आणि आगामी अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षाही तेजीला लाभदायक ठरल्या.
मागील सप्ताहात बाजारात नफा कमविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने घसरण झाली होती. त्यामुळे चांगल्या किमतीत उपलब्ध असणारे समभाग खरेदी करऱ्याची संधी अनेकांनी घेतली. बाजाराला आता अधिक सवलतींची अपेक्षा असल्याने त्या मिळाल्यास बाजारात आणखी वाढ होऊ शकते.
मागील सप्ताहात मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने नवीन उच्चांकाची नोंद केली.२५४१९.१४ अशी उच्चांकी झेप घेतल्यानंतर तो २५३९६.४६ अंशांवर बंद झाला. मागील सप्तापेक्षा त्यामध्ये ११७९.१२ अंश म्हणजेच ४.८७ टक्के वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)७५८३.४० अंशांवर बंद झाला. त्यामध्ये ३५३.४५ अंश म्हणजेच ४.८९ टक्के वाढ झाली.
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने एसएलआरमध्ये कपात केल्याने चांगल्या प्रमाणात पैसा अर्थव्यवस्थेत खेळणार आहे.त्यामुळे बाजाराला रोखतेची चणचण भासणार नाही. आगामी अर्थसंकल्पातही अन्य काही सवलतर मिळण्याची अपेक्षा बाजार बाळगून असल्याने पुढील तेजीसाठी आताच खरेदी केली जात असल्याचे बोलले जाते.त्यातच युरोपियन बॅँकेने व्याजदरात कपात केल्याने जगभरातील बाजारही काहीसे तेजीत राहिले. देशातील परचेस मॅनेजर्स इंडेक्स(पीएमआय)मध्ये थोड्या प्रमाणावर झालेली वाढ ही औद्योगिक क्षेत्रातील मंदी काही प्रमाणात कमी होण्याची निदर्शक मानली जाते. त्यामुळेही बाजारात तेजी आणली. अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला सरकारने काही सवलती जाहीर केल्याने या उद्योगातील आस्थापनांचे समभाग अचानक तेजीत आले. बँकांच्या समभागांनाही मोठी मागणी दिसून आली.
मान्सूनची चाहूल लागल्याने बाजारही आता सावध झाला आहे. भारतीय बाजार हा अन्य आशियार्त्त बाजारांपेक्षा अधिक आकर्षक परतावा देणारा असल्याने परकीय वित्तसंस्थांची भारतामधील गुंतवणूक अजूनही सुरूच आहे. अर्थसंकल्पात काही सवलती मिळण्याच्या अपेक्षेने सध्या या संस्था जोरदार गुंतवणूक करताना दिसत आहेत.

Web Title: Stocks reached new heights