Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Crash Updates: शेअर बाजारात मोठा भूकंप, Sensex २१०० पेक्षा अधिक अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ८.५ लाख कोटींचा झटका

Stock Market Crash Updates: शेअर बाजारात मोठा भूकंप, Sensex २१०० पेक्षा अधिक अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ८.५ लाख कोटींचा झटका

Stock Market Crash Live Updates: शेअर बाजारामध्ये आज चौफेर घसरण पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. बीएसई (BSE) चा ३० शेअर्सचा निर्देशांक 'सेन्सेक्स' २१६४ अंकांची मोठी डुबकी लगावून ७४,५३९ च्या पातळीवर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 14:56 IST2026-03-19T14:55:29+5:302026-03-19T14:56:58+5:30

Stock Market Crash Live Updates: शेअर बाजारामध्ये आज चौफेर घसरण पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. बीएसई (BSE) चा ३० शेअर्सचा निर्देशांक 'सेन्सेक्स' २१६४ अंकांची मोठी डुबकी लगावून ७४,५३९ च्या पातळीवर आला आहे.

Stock Market Crash Live Updates Big fall in the stock market Sensex collapses by more than 2100 points investors suffer a shock of Rs 8 5 lakh crore | Stock Market Crash Updates: शेअर बाजारात मोठा भूकंप, Sensex २१०० पेक्षा अधिक अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ८.५ लाख कोटींचा झटका

Stock Market Crash Updates: शेअर बाजारात मोठा भूकंप, Sensex २१०० पेक्षा अधिक अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ८.५ लाख कोटींचा झटका

Stock Market Crash Live Updates: शेअर बाजारामध्ये आज चौफेर घसरण पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. बीएसई (BSE) चा ३० शेअर्सचा निर्देशांक 'सेन्सेक्स' २१६४ अंकांची मोठी डुबकी लगावून ७४,५३९ च्या पातळीवर आला आहे. त्याचप्रमाणे निफ्टी ६७२ अंकांच्या घसरणीसह २३,१०५ वर पोहोचला आहे. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही २ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे, निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी केवळ ओएनजीसी (ONGC) हा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये आहे, तर सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. दरम्यान, यामुळे गुंतवणूकदारांचं ८.५ लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं.

प्रमुख शेअर्स आणि क्षेत्रांची बिकट अवस्था

भारतीय बाजारपेठेत आलेल्या या भूकंपामुळे अनेक दिग्गज आणि मिडकॅप शेअर्समध्ये तीव्र विक्री दिसून आली. सेन्सेक्सवर इटरनल ५.४६%, बजाज फायनान्स ५.३४%, महिंद्रा अँड महिंद्रा ४.८६%, एलअँडटी ४.५७%, एचडीएफसी बँक ४.३५%, इंडिगो ४.२१% आणि बजाज फिनसर्व्ह ४.०८ टक्क्यांनी घसरले आहेत. केमिकल क्षेत्रातील कंपनी 'कॅमलिन फाईन सायन्सेस'मध्ये सर्वाधिक ६.८७% घसरण झाली असून तो शेअर १२०.६० रुपयांवर आला आहे, तर फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी सिप्लामध्येही २ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. क्षेत्रीय नुकसानीचा विचार करता, निफ्टी ऑटो ४.१% पेक्षा जास्त कोसळला आहे. रिअल्टी क्षेत्रात ३.४% तर मेटल, आयटी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि बँकिंग निर्देशांकात सुमारे ३ टक्क्यांची घसरण झाली.

जागतिक बाजारावर दबाव आणि कच्च्या तेलाचा भडका

मध्य पूर्वेतील संघर्षा मुळे तेल आणि वायूच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे महागाई वाढण्याची आणि आर्थिक विकासावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्याचा दबाव जागतिक इक्विटी मार्केटवर दिसून येत आहे. युरोपचा 'स्टॉक्स ६००' १.२ टक्क्यांनी घसरून या वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर आला आहे, तर MSCI आशिया पॅसिफिक इंडेक्समध्ये २.७% आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील इक्विटीमध्ये २.६% घट झाली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात भूकंप; ₹१३,००० नं आपटले चांदीचे दर; Gold च्या दरातही मोठी घसरण

ऊर्जा संकट आणि वाढत्या किमती

कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी कायम असून ब्रेंट क्रूड सुमारे ५.७ टक्क्यांनी वधारून ११३ डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचलं आहे. युद्ध सुरू झाल्यापासून यात सुमारे ४८ टक्क्यांची वाढ झाली. एका महत्त्वाच्या एलएनजी निर्यात केंद्राचं नुकसान झाल्यामुळे युरोपियन नॅशनल गॅसच्या किमतीत ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, यामुळे पुरवठा विस्कळीत होण्याची चिंता अधिक गडद झाली आहे.

Web Title : शेयर बाजार में भारी गिरावट, निवेशकों को भारी नुकसान

Web Summary : भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट आई, सेंसेक्स 2100 अंक से अधिक गिरा। निवेशकों को 8.5 लाख करोड़ रुपये का नुकसान हुआ। ऑटो और रियल एस्टेट क्षेत्र में सबसे ज्यादा गिरावट आई। वैश्विक दबाव और बढ़ते तेल के दामों ने बिकवाली को बढ़ावा दिया।

Web Title : Stock Market Crashes: Sensex Plummets, Investors Lose Billions

Web Summary : Indian stock markets crashed, with Sensex down over 2100 points. Investors lost ₹8.5 lakh crore. All sectors declined, especially auto and realty. Global pressures and rising oil prices fueled the sell-off.