lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळीनंतर देखील शेअर बाजारात उत्साह कायम; सेन्सेक्सची पुन्हा भरारी

दिवाळीनंतर देखील शेअर बाजारात उत्साह कायम; सेन्सेक्सची पुन्हा भरारी

शेअर बाजारात सेनसेक्सनं बुधवारी देखील 40 हजरांचा टप्पा पार केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 03:53 PM2019-10-31T15:53:38+5:302019-10-31T15:53:46+5:30

शेअर बाजारात सेनसेक्सनं बुधवारी देखील 40 हजरांचा टप्पा पार केला होता.

Stock market buoyancy continues even after Diwali; Sensex Increase again | दिवाळीनंतर देखील शेअर बाजारात उत्साह कायम; सेन्सेक्सची पुन्हा भरारी

दिवाळीनंतर देखील शेअर बाजारात उत्साह कायम; सेन्सेक्सची पुन्हा भरारी

नवी दिल्लीः लाभांश वितरण कर (डीडीटी) संपवणं, कंपन्यांची चांगली कामगिरी आणि अमेरिका-चीनमध्ये भडकलेल्या व्यापार युद्धातून काहीसा दिलासा मिळाल्याच्या कारणास्तवर जगभरासह भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर बाजारात सेनसेक्सनं बुधवारी देखील 40 हजरांचा टप्पा पार केला होता. त्यातच आज देखील शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

बाजार गुरुवारी सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 263.69 अंकासह खुला होऊन 40 हजार 344.99 अंकावर पोहचला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 71.85 अंकाची वाढ होऊन 11 हजार 915.95 अंकावर पोहचला. यावेळी मुंबईतील शेअर बाजारातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सनफार्मा, टाटा मोटर्स या कंपन्या समभाग 4.35 टक्के नफ्यात होत्या. तर टाटा स्टील, अ‍ॅक्सीस बँक, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपन्यांचे शेअर 1.09 टक्के तोट्यात होते. 

शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं बुधवारी देखील 40 हजारांचा टप्पा पार केला होता. सकाळी 10.34 वाजता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 187.84 अंक म्हणजे 0.47 टक्के वाढून 40,019.68 स्तरावर पोहोचला होता. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 55.30 अंक म्हणजेच 0.47 टक्के वाढीनंतर 11842.15वर पोहोचला होता.तत्पूर्वी शेअर बाजार 39,969.68 स्तरावरच उघडला होता. त्यानंतर सेन्सेक्समध्ये 137.84 अंकांची म्हणजेच 0.35 टक्के वाढ होऊन तो 40 हजारांच्या पार गेला होता.

Web Title: Stock market buoyancy continues even after Diwali; Sensex Increase again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.