आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान शेअरबाजारातही मोठी तेजी दिसून येत आहेत. आज शेअर बाजाराची सुरूवात संथ झाली. आज सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी वाढून ७७,६३७.०१ वर खुला झाला. तर एनएसई २३,५२८.६० वर खुला झाला. मात्र, यानंतर दबाव वाढल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर, आता सेन्सेक्स (BSE SENSEX) ७७,८२४.०४ वर पोहोचला आहे.
पीएसयू शेअर्समध्ये तेजी -
आज सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे. RVNL मध्ये ५ टक्क्यांची तेजी, IRB मध्येही ५ टक्क्यांची तेजी, मझगांव डॉक, बीडीएल आमि एनएचपीसी सारख्या सेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी -
शेअर बाजारात चढ-उतार दिसत असतानाच इतर शेअर्स बरोबरच अदानी समूहाच्या सेअर्समध्येही (Adani Group Stocks) तेजी दिसत आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अदानी पॉवरचा शेअर जवळपास 4 टक्के, अदानी ग्रीन 3.52 टक्के आणि अदानी इंटरप्राइजेस 2.46%, अदानी पोर्ट, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मरच्या शेअर्समध्येही तेजी दिसत आहे.
बीएसई सेन्सेक्सच्या टॉप ३० शेअर्सपैकी ९ शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे, तर उर्वरित २१ शेअर्समध्ये वाढ होत आहे. यांत सर्वाधिक वाढ (जवळपास ३ टक्के) आयटीसी हॉटेल्समध्ये झाली आहे. याच वेळी, टायटनच्या शेअर्समध्ये काहीशी घसरण दिसून येत आहे.
एनएसईच्या टॉप ५० शेअर्समध्ये आयटीसी हॉटेल्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बेल, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर एनएसईच्या टॉप ५० स्टॉक्सपैकी २३ स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे, ज्यामध्ये हिरोमोटोकॉर्प आणि विप्रो सारख्या स्टॉक्सचा समावेश आहे.