Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?

'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?

महत्वाचे म्हणजे या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 382.40 रुपये तर उच्चांक 570 रुपये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 20:15 IST2025-06-07T20:14:11+5:302025-06-07T20:15:05+5:30

महत्वाचे म्हणजे या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 382.40 रुपये तर उच्चांक 570 रुपये आहे.

Stock market afcons infra gets loa worth rs 700 cr from mukesh ambani led reliance Will the stock be in focus on Monday | 'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?

'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?

शेअर बाजारातील सिव्हिल कंस्ट्रक्शनशी संबंधित अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर गेल्या शुक्रवारी जवळपास 3 टक्क्यांनी वधारून 436 रुपयांवर पोहोचला. आता सोमवारी पुन्हा एकदा एफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये वाढ दिसू शकते. कारण या कंपनीला मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 382.40 रुपये तर उच्चांक 570 रुपये आहे.

अशी आहे ऑर्डर -
यासंदर्भात माहिती देताना अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने म्हटले आहे की, आम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला लेटर ऑफ अवॉर्ड (LOA) प्रदान करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील दाहेज येथील व्हायनल प्रकल्पावर सिव्हिल, मेकॅनिकल, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंग कामांसाठी अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ७०० कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे. हा प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मार्च तिमाहीचे परिणाम - 
गेल्या 31 मार्चला संपलेल्या मार्च तिमाहीत अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे नेट प्रॉफिट 23% ने कमी होऊन 110.92 कोटीरुपयांवर आले. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत हे 144.90 कोटी रुपये होते. याआधीच्या तिमाहीत कंपनीला 148.85 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट झाला होता. तसेच, ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत ३,२२३.२७ कोटी रुपये एवढा होता. जो या आधीच्या वर्षात ३,६३६.४३ कोटी रुपये होता.

डिव्हिडेंड आणि ऑर्डर बुक -
या तिमाही परिणामांसोबतच अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळाने 2.50 रुपयांचा डिव्हिडेंडला मंजुरी दिली होती. याशिवाय, कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष (पूर्ण-वेळ संचालक) सुब्रमण्यम कृष्णमूर्ती यांनी स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये सांगितले की कर्जाच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. आमची ऑर्डर बुक ३६,८६९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यात १०,६६२ कोटी रुपयांच्या एल१ प्रकल्पांचा समावेश नाही.

Web Title: Stock market afcons infra gets loa worth rs 700 cr from mukesh ambani led reliance Will the stock be in focus on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.