Lokmat Money > बिझनेस न्यूज > २७०० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द होताच स्टॉक १८ टक्के घसरला; कंपनीकडून मोठी अपडेट

२७०० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द होताच स्टॉक १८ टक्के घसरला; कंपनीकडून मोठी अपडेट

Stock Crash : सुरुवातीच्या कामकाजापासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अलीकडेच २७०० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:38 IST2024-12-18T12:34:51+5:302024-12-18T12:38:38+5:30

Stock Crash : सुरुवातीच्या कामकाजापासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अलीकडेच २७०० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे.

stock crash today va tech wabag share price drops 18 percent due to order cancellation | २७०० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द होताच स्टॉक १८ टक्के घसरला; कंपनीकडून मोठी अपडेट

२७०० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द होताच स्टॉक १८ टक्के घसरला; कंपनीकडून मोठी अपडेट

Stock Crash : गेल्या महिनाभरापासून शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. कधी मार्केट भर्रकन वर जातं तर कधी धापदिशी आपटतं. बुधवारी (18 डिसेंबर) बाजार सुरू होताच पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या व्हीए टेक वाबाग या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये खालच्या पातळीपासून थोडी सुधारणा दिसून आली. वास्तविक, स्टॉकमधील या घसरणीचे कारण म्हणजे कंपनीला मिळालेली मोठी ऑर्डर रद्द झाली. सौदी अरेबियाने कंपनीला ३०० MDL मेगा सीवॉटर डिसेलिनेशन प्लांटसाठी २७०० कोटी रुपयांची ऑर्डर दिली होती. परंतु, अंतर्गत प्रशासकीय प्रक्रियेचे कारण देत हा आदेश रद्द करण्यात आला आहे.

कंपनीला ६ सप्टेंबर रोजी सौदी अरेबियाकडून ३१७ मिलियन डॉलर म्हणजेच २,७०० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. सध्या ते सौदी अरेबियाच्या प्राधिकरणाच्या संपर्कात असून याबाबत चर्चा करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सौदे अरेबियासोबतचा प्रकल्प काय होता?
व्हीए टेक वाबाग कंपनीने ६ सप्टेंबर रोजी एक्सचेंजेसला २७०० कोटी रुपयांच्या या ऑर्डरची माहिती दिली होती. कंपनीला अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम आणि कमिशनिंग (EPCC) च्या आधारावर हा आदेश मिळाला आहे. सौदी अरेबियातील यानबू येथील समुद्राचे खारे पाणी स्वच्छ आणि ताजे बनवण्यासाठी कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे. त्याची क्षमता प्रतिदिन ३०० दशलक्ष लिटर (एमएलडी) होती. हा डिसेलिनेशन प्लांट ऑर्डर मिळाल्यापासून ३० महिन्यांच्या आत पूर्ण करायचा होता. त्यादरम्यान कंपनीने सांगितले होते की हा प्लांट उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि प्रचंड कार्यक्षमतेने बांधला जाईल. पर्यावरणाशी संबंधित नियमांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले होते.

पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक
VA Tech Wabag कंपनी सौदी अरेबियामध्ये नवीन नाही. जवळपास ४ दशकांपासून कंपनीचे तिथे काम सुरू आहे. कंपनी येथे कचरा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन आणि संचालन करत आहे. जगभरातील अनेक शेअर बाजारात कंपनी लिस्टेड आहे. कंपनीने १७ देशांमध्ये ६० हून अधिक डिसेलिनेशन प्लांट उभारले आहेत.

शेअर्सने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत
जर आपण गेल्या एका वर्षातील शेअर्सच्या कामगिरीबद्दल बोललो तर त्यात १९३% वाढ झाली आहे. अशाप्रकारे, गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये सुमारे ३ पट वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉकमध्ये १५५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. स्टॉकचा ५२-आठवड्याचा उच्चांक १९४४ रुपये प्रति शेअर असून ५२-आठवड्याचा नीचांक ५७५.१५ रुपये प्रति शेअर आहे.

डिस्क्लेमर : आम्ही फक्त कंपनीच्या कामगिरीची माहिती दिली आहेय गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागार किंवा प्रमाणित तज्ञाचा सल्ला नक्की घ्या.

Web Title: stock crash today va tech wabag share price drops 18 percent due to order cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.