Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अकोल्यात चिनी उद्योजक उभारणार अत्याधुनिक रेशीम धागा प्रकल्प

अकोल्यात चिनी उद्योजक उभारणार अत्याधुनिक रेशीम धागा प्रकल्प

जिल्ह्यातील शिर्ला येथे रेशीम प्रशिक्षण व अंडीपुंज निर्मिती केंद्रात रेशीमधागा निर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्याचा संकल्प चिनी

By admin | Updated: June 13, 2015 00:16 IST2015-06-13T00:16:13+5:302015-06-13T00:16:13+5:30

जिल्ह्यातील शिर्ला येथे रेशीम प्रशिक्षण व अंडीपुंज निर्मिती केंद्रात रेशीमधागा निर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्याचा संकल्प चिनी

The state-of-the-art silk thread project will be set up in Akola | अकोल्यात चिनी उद्योजक उभारणार अत्याधुनिक रेशीम धागा प्रकल्प

अकोल्यात चिनी उद्योजक उभारणार अत्याधुनिक रेशीम धागा प्रकल्प

शिर्ला (अकोला): जिल्ह्यातील शिर्ला येथे रेशीम प्रशिक्षण व अंडीपुंज निर्मिती केंद्रात रेशीमधागा निर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्याचा संकल्प चिनी युवा उद्योजक गिबाँग यांनी केला असून, त्यासाठी १० जून रोजी त्यांनी शिर्ला येथील रेशीम प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली.
शिर्ला येथे रेशीम प्रशिक्षण व अंडीपुंज निर्मिती केंद्रात रेशीमकोषापासून धागा बनविणारी अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रे बसवायची, त्याबरोबरच महाराष्ट्र, आंध्र प्रदेशासह जवळच्या राज्यांतून रेशीम कोष खरेदी करून त्यापासून रेशीमधागा बनविण्याची योजना शांघाय येथील उद्योजक गिबाँग यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केली. शिर्ला येथील १२ एकरातील या प्रकल्पात अंडीपुंज निर्मिती केंद्र, प्रशिक्षण केंद्र, दुमजली इमारत, दोन भव्य कीटपालनगृह, तसेच १३ निवासी क्वार्टर्स आहेत. नागपूर प्रादेशिक रेशीम अधिकारी ए. एल. मोरे, एस. एस. शिंदे यांनी माहिती दिली.

Web Title: The state-of-the-art silk thread project will be set up in Akola