Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्पाईस जेटला आकाश मोकळे !

स्पाईस जेटला आकाश मोकळे !

दहा तास विमानसेवा ठप्प पडल्यानंतर गुरुवारी स्पाईस जेटसाठी आकाश मोकळे झाले. इंधन खरेदीसाठी तातडीने तीन कोटी रुपये अदा केल्यामुळे

By admin | Updated: December 19, 2014 04:07 IST2014-12-19T04:07:36+5:302014-12-19T04:07:36+5:30

दहा तास विमानसेवा ठप्प पडल्यानंतर गुरुवारी स्पाईस जेटसाठी आकाश मोकळे झाले. इंधन खरेदीसाठी तातडीने तीन कोटी रुपये अदा केल्यामुळे

Spice jets open the sky! | स्पाईस जेटला आकाश मोकळे !

स्पाईस जेटला आकाश मोकळे !

नवी दिल्ली : दहा तास विमानसेवा ठप्प पडल्यानंतर गुरुवारी स्पाईस जेटसाठी आकाश मोकळे झाले. इंधन खरेदीसाठी तातडीने तीन कोटी रुपये अदा केल्यामुळे आर्थिक संकटात घोंगावणाऱ्या स्पाईस जेटची सेवा पूर्ववत झाली. कंपनीला अंशत: का होईना सेवा सुरू करता आली.
तेल विपणन कंपन्यांनी इंधन देण्यास सपशेल नकार दिल्याने स्पाईस जेटला १५० उड्डाणे रद्द करावी लागली होती.
इंधनासाठी पैसे मोजल्याने स्पाईस जेटची विमानसेवा गुरुवारी सकाळपासून पूर्ववत झाली. गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून दिल्लीहून मुंबई, जयपूर, पोर्ट ब्लेअर, कोची आणि वाराणसीकडे पाच विमानांनी उड्डाण केले. बुधवारी दुपारी चारनंतर स्पाईस जेटच्या एकूण २४३ उड्डाणांपैकी १५० उड्डाणे रद्द करणे भाग पडले होते. स्पाईस जेटचे प्रवर्तक अजय सिंह यांनी नागरी उड्डयन सचिव व्ही. सोमसुंदरम यांची भेट घेतल्याचे समजते. स्पाईस जेट कंपनीत पुन्हा गुंतवणूक करण्याची प्रवर्तकांची योजना असल्याचे बोलले जाते. तथापि, या थेट प्रश्नावर अजय सिंह यांनी उत्तर देण्यास नकार दिला. स्पाईस जेटची प्रमुख कंपनी असलेल्या सन समूहाचे मुख्य वित्त अधिकारी एस. एल. नारायणन यांनी सांगितले की, बँकांकडून थोडीशी मुदत मिळाल्यास आणि कलानिधी मारन हमी देण्यास तयार झाले, तर स्पाईस जेटचे कामकाज सुरळीत होऊ शकते.
 

 

Web Title: Spice jets open the sky!