Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात हाहाकार, लागलं सर्किट ब्रेकर; चलन १७ वर्षांच्या नीचांकी स्तरावर

दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात हाहाकार, लागलं सर्किट ब्रेकर; चलन १७ वर्षांच्या नीचांकी स्तरावर

South Korean Stock Market-Won: दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धाच्या तणावामुळे कोरियन शेअर बाजार आणि तेथील चलन ‘वोन’चं कंबरडं मोडलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:18 IST2026-03-04T15:18:02+5:302026-03-04T15:18:21+5:30

South Korean Stock Market-Won: दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धाच्या तणावामुळे कोरियन शेअर बाजार आणि तेथील चलन ‘वोन’चं कंबरडं मोडलं आहे.

South Korean stock market kospi nikkei 225 plunges 4 march 2026 circuit breaker triggered currency won hits 17 year low | दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात हाहाकार, लागलं सर्किट ब्रेकर; चलन १७ वर्षांच्या नीचांकी स्तरावर

दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात हाहाकार, लागलं सर्किट ब्रेकर; चलन १७ वर्षांच्या नीचांकी स्तरावर

South Korean Stock Market-Won: दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धाच्या तणावामुळे कोरियन शेअर बाजार आणि तेथील चलन ‘वोन’चं कंबरडं मोडलं आहे. बुधवारी दक्षिण कोरियन मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली, ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलर्स बुडाले.

शेअर बाजारात हाहाकार

बुधवारी दक्षिण कोरियाचा मुख्य शेअर बाजार निर्देशांक KOSPI ८ टक्क्यांहून अधिक घसरला. बाजारातील घसरण इतकी वेगवान होती की व्यवहार मध्यातच थांबवावे लागले, ज्याला तांत्रिक भाषेत ‘सर्किट ब्रेकर’ असं म्हणतात. गेल्या दोन दिवसांत बाजारपेठेतून सुमारे ५६२.४ ट्रिलियन वोन (सुमारे ३८० अब्ज डॉलर) काढले गेले. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि ह्युंदाई मोटर यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण नोंदवण्यात आली.

SBI मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रुपये मिळणार; पटापट पाहा कॅलक्युलेशन

चलनात विक्रमी घसरण

'इंडियन एक्स्प्रेस'नुसार, दक्षिण कोरियाचे चलन ‘वोन’ची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरून १,५०५.८ पर्यंत खाली आली आहे. २००९ च्या जागतिक मंदीनंतरची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. जेव्हा चलन इतकं कमकुवत होतं, तेव्हा देशासाठी आयात करणं महाग होतं. विदेशी गुंतवणूकदार आपला पैसा कोरियन बाजारातून काढून सुरक्षित ठिकाणी नेत आहेत, ज्यामुळे 'वोन'चं मूल्य आणखी घसरत आहे.

नक्की कसली भीती?

दक्षिण कोरियाच्या या परिस्थितीमागे प्रामुख्याने तीन मोठी कारणं आहेत :

१. कच्च्या तेलावरील अवलंबित्व: दक्षिण कोरिया आपल्या ऊर्जा गरजांसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. तो जगातील चौथा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे.
२. मिडल ईस्ट वॉर: इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे तेल पुरवठा खंडित होण्याची भीती आहे. कोरिया आपले ७०% तेल मिडल ईस्टकडूनच खरेदी करतो. जर तेलाच्या किमती वाढल्या, तर कोरियाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडू शकते.
३. विदेशी गुंतवणूकदारांची एक्झिट: गेल्या १० दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदार सातत्यानं शेअर्स विकून बाजारातून बाहेर पडत आहेत.

सरकार आणि बँक ऑफ कोरियाची भूमिका

बाजारातील ही खळबळ पाहून बँक ऑफ कोरियाने मोर्चा सांभाळला आहे. बँकेनं निवेदन जारी करत, त्यांनी बाजाराच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं. जोपर्यंत मिडल ईस्टमध्ये तणाव कमी होत नाही, तोपर्यंत 'वोन' आणि शेअर बाजारात स्थिरता येणे कठीण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

Web Title : दक्षिण कोरियाई शेयर बाजार में हाहाकार, सर्किट ब्रेकर लगा, वोन निचले स्तर पर।

Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच दक्षिण कोरियाई बाजार में उथल-पुथल। शेयर बाजार में गिरावट, सर्किट ब्रेकर सक्रिय। तेल आयात पर निर्भरता और विदेशी निवेशकों के पलायन से वोन 17 साल के निचले स्तर पर।

Web Title : South Korea's stock market crashes, circuit breaker triggered, won at low.

Web Summary : South Korea's market faces turmoil amid Middle East tensions. Stock market crashed, triggering circuit breaker. The Won hits a 17-year low due to reliance on oil imports and foreign investor exits.