Baba Vanga Prediction: सोने आणि चांदीच्या दरांना गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारापासून ते परदेशी बाजारांपर्यंत तेजी पाहायला मिळाली आहे. दिवाळीनंतर भारतीय स्थानिक बाजारात किंचित घसरण झाली असली, तरी एकूण वाढीच्या तुलनेत ही घसरण फारच कमी आहे. आता २०२५ हे वर्ष लवकरच संपणार असल्यानं, २०२६ मध्ये सोन्याच्या दरात काय चढ-उतार होतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान, बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी पुढील वर्षासाठी काही भाकितं केली आहेत, जी यापूर्वी कधीही झाली नव्हती. त्यांच्या मते, २०२६ मध्ये मोठ्या जागतिक उलथापालथीमुळे सोन्याच्या दरात जबरदस्त उसळी पाहायला मिळेल. बाजारामध्ये मंदी (Recession) आल्यास सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांक गाठतील.
काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी?
बल्गेरियन बाबा वेंगा यांनी २०२६ मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, जगाच्या बाजारपेठांमध्ये उलथापालथ होऊ शकते, ज्यामुळे मंदीचे संकेत दिसू शकतात. जर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि जागतिक स्तरावर मोठं संकट आलं, तर सोन्याचे दर नवा विक्रम करू शकतात. जेव्हा चलन बाजार अस्थिर असतात तेव्हा लोक पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतील आणि यामुळे २०२६ मध्ये सोने विक्रमी उच्चांक गाठेल असा वेंगा यांचा विश्वास होता.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
जाणकार काय म्हणाले?
बाजार जाणकारांचे मत आहे की, जर असे घडले, तर सोन्याच्या दरात २५ ते ४० टक्क्यांची वाढ दिसू शकते. म्हणजेच, पुढील वर्षी दिवाळीच्या वेळी सोन्याचे दर ₹१,६२,५०० ते ₹१,८२,००० प्रति १० ग्रॅमच्या दरम्यान असू शकतात. ज्यामुळे सोन्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित होऊ शकतो.
देशांतर्गत फ्युचर मार्केटमध्ये सोन्याची स्थिती
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ५ डिसेंबरच्या मुदतीचा असलेला सोन्याचा फ्युचर वायदा, सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी ₹१,२३,५८७ (प्रति १० ग्रॅम) वर उघडला होता. तर, कामकाजाच्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत त्यात घसरण नोंदवली गेली आणि तो ₹१,२३,४५१ वर ट्रेड करत बंद झाला. शुक्रवारी MCX वर सोन्यानं ₹१,२४,२३९ चा उच्चांक गाठला होता.
तसंच, सोनं ₹१,२१,४०० च्या नीचांकी पातळीवर पोहोचलं होतं. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात जबरदस्त वाढ दिसत होती आणि तो ₹१,३०,००० पर्यंत पोहोचला होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या सोन्याच्या दरांमध्ये घट पाहायला मिळत आहे.
