lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारामध्ये किरकोळ घट

शेअर बाजारामध्ये किरकोळ घट

सोमवारी बाजाराचा प्रारंभ ४५० अंशांपेक्षा अधिक झाला. दिवसभरामध्ये निर्देशांकाने ८०० अंशांमध्ये चढ- उतार बघितले. दिवसअखेर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३१,५६१.२२ अंशंवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:03 AM2020-05-12T00:03:13+5:302020-05-12T00:03:56+5:30

सोमवारी बाजाराचा प्रारंभ ४५० अंशांपेक्षा अधिक झाला. दिवसभरामध्ये निर्देशांकाने ८०० अंशांमध्ये चढ- उतार बघितले. दिवसअखेर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३१,५६१.२२ अंशंवर बंद झाला.

 A slight decline in the stock market | शेअर बाजारामध्ये किरकोळ घट

शेअर बाजारामध्ये किरकोळ घट

मुंबई : जागतिक बाजारामध्ये असलेले संमिश्र वातावरण आणि कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे बाजारात निराशेचे वातावरण पसरून दिवसअखेर शेअर बाजार थोड्या प्रमाणात खाली येऊन बंद झाला.
सोमवारी बाजाराचा प्रारंभ ४५० अंशांपेक्षा अधिक झाला. दिवसभरामध्ये निर्देशांकाने ८०० अंशांमध्ये चढ- उतार बघितले. दिवसअखेर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३१,५६१.२२ अंशंवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ८१.४८ अंशांची घट झाली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही घट झाली. हा निर्देशांक १२.३० अंशांनी खाली येऊन ९,२३९.२० अंशांवर बंद झाला. बॅँकांच्या समभागांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली. वाहन कंपन्यांचे समभाग वाढलेले दिसले.

Web Title:  A slight decline in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.