Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Multibagger Penny Stock: शेअर असावा तर असा! दररोज लागतंय अपर सर्किट, महिन्याभरात दिलाय ७०% चा रिटर्न

Multibagger Penny Stock: शेअर असावा तर असा! दररोज लागतंय अपर सर्किट, महिन्याभरात दिलाय ७०% चा रिटर्न

Multibagger Penny Stock: गेल्या २७ जानेवारीपासून या शेअरला दररोज अपर सर्किट लागत आहे. अवघ्या एका महिन्यात हा शेअर सुमारे ७० टक्क्यांनी वधारलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:01 IST2026-02-11T13:00:06+5:302026-02-11T13:01:12+5:30

Multibagger Penny Stock: गेल्या २७ जानेवारीपासून या शेअरला दररोज अपर सर्किट लागत आहे. अवघ्या एका महिन्यात हा शेअर सुमारे ७० टक्क्यांनी वधारलाय.

Silverline Technologies Multibagger Penny Stock Upper circuit every day 70 percent return has been given in a month | Multibagger Penny Stock: शेअर असावा तर असा! दररोज लागतंय अपर सर्किट, महिन्याभरात दिलाय ७०% चा रिटर्न

Multibagger Penny Stock: शेअर असावा तर असा! दररोज लागतंय अपर सर्किट, महिन्याभरात दिलाय ७०% चा रिटर्न

Multibagger Penny Stock: ग्लोबल टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग, सॉफ्टवेअर आणि बिझनेस सोल्यूशन कंपनी सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीजच्या (Silverline Technologies) शेअर्समध्ये सध्या मोठी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या २७ जानेवारीपासून या शेअरला दररोज अपर सर्किट लागत आहे. अवघ्या एका महिन्यात हा शेअर सुमारे ७० टक्क्यांनी वधारलाय. या तेजीमागचं कारण समजून घेतल्यास तुम्हीही थक्क व्हाल. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये (NYSE) लिस्ट होणारी ही पहिली भारतीय कंपनी असून, तिला पूर्वी सिल्व्हरलाइन इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ओळखलं जात होतं.

'सिल्व्हर एआय' प्लॅटफॉर्मला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद

सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीजने याच महिन्याच्या २ तारखेला "सिल्व्हर एआय" (SilverAI) नावाचा एआय-सक्षम वेब प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या प्लॅटफॉर्मला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून एका आठवड्यात सुमारे २५ हजार युजर्सनं यावर नोंदणी केली आहे. येत्या ४५ दिवसांत ही संख्या ५ लाखांपर्यंत पोहोचेल, असा कंपनीचा अंदाज आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी आपल्या 'प्रो' मेम्बरशिपची फी कमी करुन ९ डॉलर प्रति युजर करणार आहे.

महसुलात प्रचंड वाढ होण्याची शक्यता

जर ५ लाख युजर्स दरमहा ९ डॉलर शुल्कावर या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले, तर कंपनीची वार्षिक महसूल क्षमता ४३० ते ४५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय, वापरकर्त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी कंपनीनं पुढील सहा महिन्यांसाठी सर्व वापरकर्त्यांना अटी व शर्तींनुसार 'सिल्व्हर एआय'चं प्रो व्हर्जन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कंपनीचे एमडी याकिन जोशी यांनी सांगितलं की, युजर्सच्या वाढत्या संख्येनुसार कंपनी किमतीचे मॉडेल ठरवत आहे. ५ लाख रजिस्टर्ड युजर्सचं उद्दिष्ट गाठल्यानंतर, दरमहा ९ डॉलर शुल्क आकारून मोठ्या प्रमाणावर वापर वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. यातून ५४ मिलियन डॉलरचा मासिक महसूल मिळवण्याची क्षमता कंपनीकडे आहे.

शेअर बाजारातील कामगिरी आणि पार्श्वभूमी

शेअर बाजारातील कामगिरीवर नजर टाकली तर, काल बीएसई (BSE) मध्ये सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीजचा शेअर १३.३१ रुपयांवर बंद झाला होता. आज सकाळी तो ५ टक्क्यांनी वधारून १३.९७ रुपयांवर उघडला, जो आजचा अपर सर्किट आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना ६९.९५ टक्के परतावा दिला आहे. १२ जानेवारी रोजी या शेअरचा भाव केवळ ८.२२ रुपये होता.

NYSE मध्ये सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय कंपनी

सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीजची स्थापना १९९२ मध्ये झाली असून कंपनीकडे एंटरप्राइज सॉफ्टवेअर, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि आयटी कन्सल्टिंगमध्ये तीन दशकांहून अधिक काळचा अनुभव आहे. २०१९ पासून कंपनीनं एआय, क्लाउड, सायबर सुरक्षा, एसएपी, ॲनालिटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध होणारी ही पहिली भारतीय कंपनी होती आणि २००२ मध्ये नॅसकॉमनं (NASSCOM) तिला भारतातील सातवी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी म्हणून दर्जा दिला होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : सिल्वरलाइन टेक्नोलॉजीज: पेनी स्टॉक में अपर सर्किट, महीने में 70% रिटर्न।

Web Summary : सिल्वरलाइन टेक्नोलॉजीज के शेयर में उछाल, दैनिक अपर सर्किट के साथ 70% मासिक रिटर्न। 'सिल्वर एआई' प्लेटफॉर्म ने उपयोगकर्ताओं को आकर्षित किया, जिससे राजस्व में वृद्धि की संभावना है। NYSE पर सूचीबद्ध, आगे बढ़ने का लक्ष्य।

Web Title : Silverline Technologies: Penny stock hits upper circuit, 70% return in month.

Web Summary : Silverline Technologies' shares surge with daily upper circuits, yielding 70% monthly returns. Their 'Silver AI' platform attracts users, potentially boosting revenue significantly. Listed on NYSE, it aims for further growth.