Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?

चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?

Silver Price Prediction : २०२६ पर्यंत चांदीचे दर ३,००,००० रुपयांपर्यंत पोहोचतील का? कालच, एमसीएक्सवर चांदीच्या किमतींनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:12 IST2026-01-13T10:09:54+5:302026-01-13T10:12:53+5:30

Silver Price Prediction : २०२६ पर्यंत चांदीचे दर ३,००,००० रुपयांपर्यंत पोहोचतील का? कालच, एमसीएक्सवर चांदीच्या किमतींनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

Silver Price Prediction 2026 Will it Hit ₹3,00,000 per kg on MCX? | चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?

चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?

Silver Price Prediction : मौल्यवान धातूंच्या बाजारात सध्या चांदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीने सर्व जुने विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक प्रस्थापित केला. तज्ज्ञांनी यापूर्वी २०२६ मध्ये चांदी २ लाखांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता ही धाव थेट ३,०००,०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

बाजारातील सद्यस्थिती
सोमवारी चांदीने मोठी झेप घेतली होती, मात्र बाजार बंद होताना किमतीत थोडी नफावसुली दिसून आली. अखेर चांदीचा भाव २,६८,१५३ रुपये प्रति किलोवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारातही कॉमेक्सवर चांदीचा दर ८५.४०५ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचल्यानंतर आज ८४.६२५ डॉलरवर व्यवहार करत आहे.

तेजीची 'ही' आहेत ३ मुख्य कारणे

  1. जागतिक तणाव : अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता संघर्ष आणि इराणमधील अस्थिर परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
  2. सुरक्षित गुंतवणूक : चलनफुगवटा आणि व्याजदरांबाबतची अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी मौल्यवान धातूंकडे वळत आहेत.
  3. मागणी आणि पुरवठा : औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी प्रचंड वाढत आहे, मात्र त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने किमतींना 'रॉकेट' गती मिळत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?
राहुल कलंत्री (मेहता इक्विटीज) : जागतिक जोखमीमुळे चांदीला बळकटी मिळत आहे. तांत्रिकदृष्ट्या चांदीला २.४८ लाखांवर भक्कम आधार असून २.५९ लाखांवर अडथळा आहे.
पोनमुडी आर (CEO, एनरिच मनी) : चांदीचा भाव २,६५,००० रुपयांच्या वर टिकून राहिल्यास तेजी कायम राहील. जर किमतीने २,७०,००० चा टप्पा ओलांडला, तर ३,००,००० रुपयांचे लक्ष्य दूर नाही. मात्र, घसरण झाल्यास भाव २.४५ लाखांपर्यंत खाली येऊ शकतो.
मोतीलाल ओसवाल : या दिग्गज ब्रोकरेज फर्मनेही चांदीच्या किमतीत दीर्घकालीन तेजीचे संकेत दिले आहेत.

वाचा - TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर

गुंतवणूकदारांनी काय करावे?
सध्या चांदी ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता कोणताही मोठा अडथळा येईपर्यंत मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा किमतीत थोडी घसरण होईल, तेव्हा खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा विचार नक्की घ्यावा.
 

Web Title : चाँदी की ऐतिहासिक उछाल! क्या यह ख़रीदने का मौका है या मुनाफ़ावसूली का समय?

Web Summary : चाँदी की कीमतें वैश्विक तनाव, सुरक्षित निवेश की मांग और आपूर्ति से अधिक औद्योगिक मांग के कारण रिकॉर्ड स्तर पर पहुँच गईं। विशेषज्ञों का सुझाव है कि गिरावट पर खरीदें, लक्ष्य ₹3,00,000/kg है, लेकिन निवेश से पहले वित्तीय सलाहकारों से सलाह लें। एक नई ऊंचाई पर पहुंचने के बाद थोड़ी मुनाफावसूली देखी गई।

Web Title : Silver Soars to Record Highs! Buy Opportunity or Profit Booking?

Web Summary : Silver prices surged to record levels, fueled by global tensions, safe-haven demand, and industrial demand exceeding supply. Experts suggest buying on dips, targeting ₹3,00,000/kg, but advise consulting financial advisors before investing. A slight profit booking was observed after hitting a new high.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.