lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाच हजारांनी स्वस्त झाली चांदी, सेन्सेक्सनही शुक्रवारी गाठला नवा उच्चांक

पाच हजारांनी स्वस्त झाली चांदी, सेन्सेक्सनही शुक्रवारी गाठला नवा उच्चांक

चांदीचे भाव ७८ हजार रुपयांवरून ७३ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 06:07 AM2023-06-17T06:07:39+5:302023-06-17T06:08:06+5:30

चांदीचे भाव ७८ हजार रुपयांवरून ७३ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत.

Silver became cheaper by 5 thousand Sensex also reached a new high on Friday | पाच हजारांनी स्वस्त झाली चांदी, सेन्सेक्सनही शुक्रवारी गाठला नवा उच्चांक

पाच हजारांनी स्वस्त झाली चांदी, सेन्सेक्सनही शुक्रवारी गाठला नवा उच्चांक

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या महिन्यात ६२ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेले सोन्याचे भाव आता ५९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहेत. सव्वा महिन्यात यामध्ये तब्बल दोन हजार ४०० रुपयांनी घसरण झाली. चांदीचे भाव पाहिले तर त्यातही पाच हजार रुपयांची घसरण होऊन ती ७८ हजार रुपयांवरून ७३ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवसापासून सातत्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत जाऊन नवनवीन उच्चांक गाठले जात होते. त्यादरम्यान ५९ हजारांपासून ६२ हजारांचा टप्पा सोन्याने ओलांडला.

चांदीची घसरण

  • ₹७८,००० - २० मे २०२३
  • ₹७५,५०० - ८ जून २०२३
  • ₹७४,३०० - ९ जून २०२३
  • ₹७३,३०० - १४ जून २०२३


सेन्सेक्सचा नवा उच्चांक

शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी नव्या उच्चांकावर बंद झाले. सेन्सेक्स ४६६.९५ अंकांनी वाढून नव्या उच्चांकासह ६३,३८४.५८ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा याआधीचा ६३,२८४.१९ अंकांचा उच्चांक गेल्या १ डिसेंबर रोजी झाला होता. निफ्टी १३७.९० अंकांनी वाढून १८,८२६ अंकांवर नव्या उच्चांकासह बंद झाला. 

Web Title: Silver became cheaper by 5 thousand Sensex also reached a new high on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.