lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे संकेत

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे संकेत

Indian Economy: ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’चे वित्त वर्ष २०२३-२४ साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धी दर अंदाज वाढवून ६.४ टक्के केला आहे. आधी तो ६.०० टक्के होता. अर्थव्यवस्थेत मजबुतीचे संकेत दिसून येत असल्यामुळे ही वाढ ‘एस अँड पी’ने केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 11:07 AM2023-11-28T11:07:39+5:302023-11-28T11:08:14+5:30

Indian Economy: ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’चे वित्त वर्ष २०२३-२४ साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धी दर अंदाज वाढवून ६.४ टक्के केला आहे. आधी तो ६.०० टक्के होता. अर्थव्यवस्थेत मजबुतीचे संकेत दिसून येत असल्यामुळे ही वाढ ‘एस अँड पी’ने केली आहे. 

Signs of strengthening Indian economy | भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे संकेत

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे संकेत

नवी दिल्ली - ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’चे वित्त वर्ष २०२३-२४ साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धी दर अंदाज वाढवून ६.४ टक्के केला आहे. आधी तो ६.०० टक्के होता. अर्थव्यवस्थेत मजबुतीचे संकेत दिसून येत असल्यामुळे ही वाढ ‘एस अँड पी’ने केली आहे. 

एस अँड पीने  वित्त वर्ष २०२४-२५ साठी भारताच्या जीडीपीचा वृद्धी दर अंदाज ६.९ टक्क्यांवरून घटवून ६.४ टक्के केला आहे. दुसऱ्या तिमाहीत वृद्धी धिमी होऊ शकते. त्यामुळे अनुमानात घट करण्यात आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा मंदावलेला दर आणि व्याजदरांत वाढ यामुळे चालू वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत विकासाची गती कमी असेल. परिणामी आर्थिक वर्ष २०२५साठी गृहीत धरलेल्या जीडीपी दरात घट केली आहे, असे ‘एस अँड पी’ने म्हटले आहे.

मार्च २०२४पर्यंत भारतात व्याज दर कपात?
एस अँड पी ग्लोबलने म्हटले आहे की, भारत मार्च २०२४पर्यंत धोरणात्मक व्याज दरात ०.१ टक्का कपात करू शकतो. गेल्या आठवड्यात मॉर्गन स्टेनलीने म्हटले होते की, भारत पुढील वर्षी जूनपर्यंत आशियाई देशांतील पहिली व्याज दर कपात करू शकतो.  

इंडोनेशिया, मलेशिया या देशांतही वाढ
भारताशिवाय इंडोनेशिया, मलेशिया आणि फिलिपिन्स हे देशही उत्तम वृद्धी दर प्राप्त करतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. चीनचा वृद्धी दर २०२३मध्ये ५.४ टक्के आणि २०२४मध्ये ४.६ टक्के राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Signs of strengthening Indian economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.