Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली

Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली

Share Market: भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. इराणसोबत राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या आशेनं जगभरातील बाजारांसह भारतीय गुंतवणूकदारांमध्येही मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:05 IST2026-04-15T10:05:30+5:302026-04-15T10:05:30+5:30

Share Market: भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. इराणसोबत राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या आशेनं जगभरातील बाजारांसह भारतीय गुंतवणूकदारांमध्येही मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

Share Market today Stormy rally in the stock market Sensex jumps 1200 points Nifty above 24200 Strong rally in these shares | Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली

Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली

Share Market: भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. इराणसोबत राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या आशेनं जगभरातील बाजारांसह भारतीय गुंतवणूकदारांमध्येही मोठा उत्साह निर्माण झाला आहे. बाजार उघडताच बीएसईचा (BSE) सेन्सेक्स १,२९३.७६ अंकांनी म्हणजेच १.६८% च्या वाढीसह ७८,१४१.३३ च्या पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी देखील मागे राहिला नाही आणि ३६६.३० अंकांच्या (१.५४%) उसळीसह २४,२०८.९५ च्या पातळीच्या पार गेला.

बाजारात चौफेर खरेदीचा ओघ

आजच्या व्यवहारातील सर्वात मोठी बाब म्हणजे बाजारात केवळ काही निवडक शेअर्सच नव्हे, तर चौफेर खरेदी पाहायला मिळाली. बाजारातील आकडेवारीनुसार, सुमारे २,३२७ शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली, तर केवळ ३७७ शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच १५४ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. ही आकडेवारी गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास पुन्हा एकदा भक्कमपणे परतल्याचं दर्शवते.

जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत

बँकिंग आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठी तेजी

निफ्टी बँक इंडेक्समध्ये आज २% ची शानदार तेजी दिसून आली. बँकिंग क्षेत्रात युनियन बँक (३.४४%), इंडसइंड बँक (३.४१%) आणि आयडीएफसी फर्स्ट बँक (३.०८%) यांमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. याशिवाय कॅनरा बँक आणि पीएनबीच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

एव्हिएशन क्षेत्राबद्दल बोलायचं झाले तर, इंटरग्लोब एव्हिएशनच्या (IndiGo) शेअरमध्ये ४.५४% ची वादळी तेजी पाहायला मिळाली. यासोबतच अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, श्रीराम फायनान्स आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज हे निफ्टीच्या 'टॉप गेनर्स'मध्ये सामील झाले.

काही शेअर्समध्ये निराशा

इतकी मोठी तेजी असूनही काही शेअर्सवर दबाब दिसून आला. डॉ. रेड्डीज लॅब्स, ओएनजीसी (ONGC) आणि कोल इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण नोंदवण्यात आली. मात्र, बाजारातील एकूण तेजी इतकी मोठी होती की, या घसरण झालेल्या शेअर्सचा सेन्सेक्सवर फारसा परिणाम झाला नाही.

Web Title : शेयर बाजार में उछाल: सेंसेक्स 1200 अंक ऊपर, निफ्टी 24,200 के पार

Web Summary : राजनयिक उम्मीदों के बीच भारतीय शेयर बाजार में तेजी। सेंसेक्स 1200 अंक ऊपर, निफ्टी 24,200 के पार, बैंकिंग और विमानन क्षेत्रों में खरीदारी से वृद्धि। कुछ शेयरों में मामूली गिरावट आई।

Web Title : Stock Market Soars: Sensex Jumps 1200 Points, Nifty Above 24,200

Web Summary : Indian stock market rallies amid renewed diplomatic hopes. Sensex surges 1200 points, Nifty crosses 24,200, fueled by broad-based buying, especially in banking and aviation sectors. Select stocks experienced minor declines.