शेअर बाजारातील स्मॉल-कॅप मल्टीबॅगर स्टॉक कोलाब प्लॅटफॉर्मप् लिमिटेड (Colab Platforms Ltd)च्या शेअरमध्ये आज सोमवारीही सलग 19व्या सेशनमध्येही अप्पर सर्किटलागले आहे. हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे.
या शेअरमध्ये वर्षभरात 480% ची तेजी नोंदवण्यात आली आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत 7 रुपये होती. सोमवारी बीएसईवर हा शेअर ₹43.12 वर पोहोचला. महत्वाचे म्हणजे आज ओपन होताच याला 2 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. यानंतर तो याच किंमतीवर म्हणजेच 43.12 वर बंद झाला.
ऑक्टोबर महिन्यात ₹5.42 वर होता हा शेअर
स्मॉल-कॅप स्टॉक कोलाब प्लेटफॉर्म्सची शेअर प्राइस ऑक्टोबर महिन्यात ₹5.42 या 52-आठवड्यांच्या अथवा 1-वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती. यानंत, या वर्षाच्या मे महिन्यात या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आणि तो ₹76.18 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या अथवा एक वर्षाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
पाच वर्षांषांचा विचार करता 3856% ने वधारला हा शेअर -
या शेअरची किंमत एका महिन्यात 60% ने वधारली आहे. 2025 मध्ये आजपर्यंत हा शेअर 180% ने वधारला आहे. एका वर्षात 483% वाढला. तर पाच वर्षांचा विचार करता हा शेअर 3856% ने वधारला आहे. अशा पद्धतीने या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)