Share Market Investment: आज सकाळी ९ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स १३५.७९ अंकांनी वधारून ८०,५६२.२५ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, निफ्टी देखील याच वेळी ४६.८५ अंकांच्या वाढीसह २४,७०१.५५ च्या पातळीवर ट्रेड करत होता. गिफ्ट निफ्टीमध्ये दिसत असलेले सकारात्मक कल भारताच्या व्यापक निर्देशांकासाठी चांगली सुरुवात दर्शवत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या ट्रेडिंग सत्रात टॉप गेनर्स मध्ये टायटन कंपनी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स आणि जिओ फायनान्शियल यांचा समावेश आहे. तर, ॲक्सिस बँक, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, टाटा कंझ्युमर आणि हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांच्या शेअर्सना बाजारात नुकसान झालं.
गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
मिडकॅप-स्मॉलकॅप इंडेक्समध्ये वाढ
बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये ०.४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ०.२ टक्क्यांची किंचित वाढ दिसून आली. सेक्टोरल स्टॉक्सबद्दल बोलायचे झाल्यास, एफएमसीजी इंडेक्समध्ये ०.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर आयटी, मेटल, ऑइल ॲन्ड गॅस, पॉवर, रियल्टी आणि कॅपिटल गुड्स या प्रत्येक सेक्टरमध्ये ०.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. बाजाराची ही सध्याची स्थिती गुंतवणूकदारांसाठी महत्त्वपूर्ण संकेत देत आहे.
रुपया ३ पैशांनी मजबूत होऊन ८८.६९ वर उघडला
सोमवारी परदेशी बाजारात आशियाई चलनांच्या सकारात्मक कलामुळे आणि अमेरिकन डॉलरच्या कमकुवतपणामुळे रुपयामध्ये मजबूती दिसून आली. रुपयानं सोमवारची सुरुवात ३ पैशांच्या वाढीसह ८८.६९ प्रति डॉलरवर केली, जी मागील बंद पातळीपेक्षा किंचित जास्त आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, परदेशी चलन व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचं म्हणणे आहे की, रुपयाचा व्यापार अजूनही मर्यादित कक्षेत सुरू आहे, कारण सुरू असलेली कॅपिटल विड्रॉव्हल (capital withdrawal) आणि भू-राजकीय घडामोडीरुपयावर दबाव कायम ठेवत आहेत.
१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीच्या (Monetary Policy Committee - MPC) बैठकीचे निकाल रुपया आणि सरकारी बाँड्सच्या भावांवर परिणाम करू शकतात. उल्लेखनीय आहे की, शुक्रवारी रुपया त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवरून सावरत ४ पैशांच्या मजबूत वाढीसह ८८.७२ प्रति डॉलरवर बंद झाला होता.