Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Holiday: उद्या श्री रामनवमीच्या दिवशी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की बंद? जाणून घ्या

Share Market Holiday: उद्या श्री रामनवमीच्या दिवशी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की बंद? जाणून घ्या

Stock Market Holidays:जाणून घ्या उद्या शेअर बाजारातील कामकाज सुरू राहणार की बंद. या महिन्यात कोण-कोणत्या दिवशी होणार नाही कामकाज.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:58 IST2026-03-25T13:57:36+5:302026-03-25T13:58:07+5:30

Stock Market Holidays:जाणून घ्या उद्या शेअर बाजारातील कामकाज सुरू राहणार की बंद. या महिन्यात कोण-कोणत्या दिवशी होणार नाही कामकाज.

Share Market Holiday 25 march 2026 Will the stock market be open or closed tomorrow on Ram Navami When else is the holiday mahavir jayanti | Share Market Holiday: उद्या श्री रामनवमीच्या दिवशी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की बंद? जाणून घ्या

Share Market Holiday: उद्या श्री रामनवमीच्या दिवशी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की बंद? जाणून घ्या

Stock Market Holidays: शेअर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यान गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळणार आहे. गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी श्री रामनवमी निमित्त भारतीय शेअर बाजार बंद राहतील. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, या दिवशी इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी सेगमेंटमध्ये कोणताही व्यवहार होणार नाही. बाजारातील ट्रेडिंग आता शुक्रवार, २७ मार्च रोजी पुन्हा सुरू होईल.

काय आहे तपशील?

यावेळी गुंतवणूकदारांसाठी विशेष बाब म्हणजे बाजार सलग दोन दिवस बंद राहणार आहेत. २६ मार्चच्या सुट्टीनंतर, २८ मार्चला शनिवार आणि २९ मार्चला रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल. म्हणजेच, शुक्रवारी एक दिवस ट्रेडिंग झाल्यानंतर पुन्हा दोन दिवसांचा ब्रेक मिळेल. मात्र, कमोडिटी मार्केटमध्ये अंशतः व्यवहार सुरू राहतील. माहितीनुसार, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये सकाळचं सत्र बंद राहील, परंतु संध्याकाळच्या सत्रात ट्रेडिंग पुन्हा सुरू होईल.

लग्न असो की वाढदिवस; आता कॅश विसरा! गिफ्ट करू शकता म्युच्युअल फंड कार्ड,  सेबीचा प्रस्ताव; किती असेल लिमिट?

३१ मार्च २०२६ रोजी देखील सुट्टी

मार्च महिन्यातील ही शेवटची मोठी सुट्टी नाही. यानंतर ३१ मार्च २०२६ रोजी महावीर जयंती निमित्त देखील शेअर बाजार बंद राहतील. म्हणजेच महिन्याच्या शेवटीही गुंतवणूकदारांना एक दिवसाचा ट्रेडिंग ब्रेक मिळेल. संपूर्ण २०२६ वर्षाचा विचार केला तर, NSE कॅलेंडरनुसार एकूण १६ दिवस बाजार बंद राहणार आहेत. यामध्ये प्रजासत्ताक दिन, होळी, गुड फ्रायडे, दसरा आणि दिवाळी यांसारख्या प्रमुख सणांचा समावेश आहे.

बँकिंग क्षेत्रावर परिणाम

बँकिंग क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर, रामनवमीमुळे २६ मार्च रोजी देशातील अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील, तर काही राज्यांमध्ये २७ मार्च रोजीही सुट्टी असेल. मात्र, ऑनलाईन बँकिंग आणि डिजिटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

Web Title : रामनवमी पर शेयर बाजार बंद: ट्रेडिंग अवकाश विवरण

Web Summary : रामनवमी के कारण 26 मार्च को शेयर बाजार बंद रहेगा। ट्रेडिंग 27 मार्च को फिर से शुरू होगा। कमोडिटी बाजार आंशिक रूप से खुला। कई शहरों में बैंक भी बंद रहेंगे। 31 मार्च को फिर छुट्टी।

Web Title : Share Market Closed on Ram Navami: Trading Holiday Details

Web Summary : Stock market is closed on March 26th for Ram Navami. Trading resumes March 27th. Commodity market partially open. Banks also closed in many cities. Another holiday on March 31st.