Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर

सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर

सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा परिणाम बाजारावर सलग तिसर्‍या दिवशी दिसून आला.

By admin | Updated: May 19, 2014 22:53 IST2014-05-19T22:53:37+5:302014-05-19T22:53:37+5:30

सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा परिणाम बाजारावर सलग तिसर्‍या दिवशी दिसून आला.

Sensex, Nifty on new apex | सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर

सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर

 मुंबई : सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा परिणाम बाजारावर सलग तिसर्‍या दिवशी दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४१ अंकांनी वधारून २४,३६३.०५ अंकावर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीसुद्धा ६०.५५ अंकांनी मजबूत होऊन ७,२६३.५५ अंकाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. शुक्रवारी निफ्टी ७,२०३, तर सेन्सेक्स २४,१२१ अंकांवर बंद झाला होता. परंतु, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने आयटी आणि फार्मा कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली राहिले. या क्षेत्रातील कंपन्यांचे बहुतांश उत्पन्न निर्यातीतूनच होते. सूत्रांनी सांगितले की, आर्थिक वृद्धीत तेजी आणण्याकरिता नवीन सरकार लवकरच पाऊल उचलेल. या अपेक्षेमुळे परकीय गुंतवणूकदारांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. ब्रोकरेज फर्म वेल्थरेज सिक्युरिटीजचे सीईओ के.के. कविकोंडाला म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आघाडीला प्रचंड बहुमत मिळाल्याने बाजारात तेजी कायम राहिली; परंतु रुपया वधारल्याने फार्मा व आयटीसारख्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले. एनटीपीसी आणि भेलचे शेअर्स अनुक्रमे १६.९४ व १०.३५ टक्क्यांनी वधारले. (प्रतिनिधी)

Web Title: Sensex, Nifty on new apex