lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टी आणखी घसरले

सेन्सेक्स, निफ्टी आणखी घसरले

विक्रीचा प्रचंड दबाव राहिल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी शुक्रवारी पुन्हा एकदा माना टाकल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0८.५९ अंकांनी घसरून २८,२६१.0८ अंकांवर बंद झाला.

By admin | Published: March 20, 2015 11:32 PM2015-03-20T23:32:07+5:302015-03-20T23:32:07+5:30

विक्रीचा प्रचंड दबाव राहिल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी शुक्रवारी पुन्हा एकदा माना टाकल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0८.५९ अंकांनी घसरून २८,२६१.0८ अंकांवर बंद झाला.

Sensex, Nifty further slid | सेन्सेक्स, निफ्टी आणखी घसरले

सेन्सेक्स, निफ्टी आणखी घसरले

मुंबई : विक्रीचा प्रचंड दबाव राहिल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी शुक्रवारी पुन्हा एकदा माना टाकल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0८.५९ अंकांनी घसरून २८,२६१.0८ अंकांवर बंद झाला. निफ्टी ६३.७५ अंकांनी घसरून ८,५७0.९0 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारांतील घसरणीचा हा सलग तिसरा दिवस होता, तसेच सलग दुसऱ्या आठवड्यातही बाजार घसरले. रिअल्टी, ऊर्जा, एफएमसीजी, टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू, आॅटो आणि भांडवली वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग घसरले. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांकही अनुक्रमे २.१४ टक्के ते १.४९ टक्के घसरले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी थोडासा वर २८,४६५.४४ अंकांवर उघडला होता. त्यानंतर मात्र तो लगेच घसरून २८,२0९.६६ अंकांपर्यंत खाली गेला. सत्रअखेरीस तो २८,२६१.0८ अंकांवर बंद झाला. २0८.५९ अंक अथवा 0.७३ टक्क्यांची घसरण त्याने नोंदवली.
हा सेन्सेक्सचा दीड महिन्याचा नीचांक ठरला. ९ फेब्रुवारीनंतरचा हा सर्वाधिक कमजोर बंद ठरला. त्या दिवशी सेन्सेक्स २८,२२७.३९ अंकांवर बंद झाला होता. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ४७५.३0 अंक गमावले आहेत. हा फटका १.६५ टक्क्यांचा आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५0 कंपन्यांवर आधारित निफ्टी ६३.७५ अंक अथवा 0.७४ टक्क्यांनी घसरून ८,५७0.९0 अंकांवर बंद झाला.
आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. चीन, जपान, सिंगापूर आणि तैवान येथील बाजार 0.१३ टक्के ते 0.९८ टक्के वर चढले. हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाचे बाजार मात्र 0.0३ टक्के ते 0.३८ टक्के घसरले. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रात तेजीचे वातावरण दिसून आले. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी येथील बाजार 0.0७ टक्के ते 0.५६ टक्के तेजी दर्शवीत होते.

1 सेन्सेक्समधील एनटीपीसी, भेल, आयसीआयसीआय, गेल, एमअँडएम, एचयूएल, टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले.
2 याशिवाय आयटीसी, सेसा स्टरलाईट, सिप्ला, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, टाटा मोटर्स यांचे समभागही घसरले. विप्रो आणि इन्फोसिस या कंपन्यांचे समभाग मात्र वर चढले.
3 बाजाराची एकूण व्याप्ती कमजोर राहिली. २,११७ कंपन्यांचे समभाग घसरले. ७५२ कंपन्यांचे समभाग वाढले. १0६ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल घटून ३,६८३.७६ कोटी झाली. आदल्या दिवशी ती ३,८३५.३१ कोटी होती.

Web Title: Sensex, Nifty further slid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.