Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका दिवसात गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी पाण्यात! सेफ हेवन सोने-चांदीतही मोठी पडझड; गुंतवणूकदार हवालदिल

एका दिवसात गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी पाण्यात! सेफ हेवन सोने-चांदीतही मोठी पडझड; गुंतवणूकदार हवालदिल

Stock Market Crash : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डगमगला असून सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर समभागांची विक्री झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:33 IST2026-03-23T16:33:32+5:302026-03-23T16:33:32+5:30

Stock Market Crash : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डगमगला असून सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर समभागांची विक्री झाली.

Sensex Crashes 1,837 Points, Nifty Down 602: Investors Lose ₹15 Lakh Crore in a Single Day | एका दिवसात गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी पाण्यात! सेफ हेवन सोने-चांदीतही मोठी पडझड; गुंतवणूकदार हवालदिल

एका दिवसात गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी पाण्यात! सेफ हेवन सोने-चांदीतही मोठी पडझड; गुंतवणूकदार हवालदिल

Stock Market Crash : पश्चिम आशियातील युद्धाचे ढग गडद होताच सोमवारी भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही काळातील सर्वात मोठी भीषण पडझड अनुभवली. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या वृत्ताने गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, बाजारावर भीतीचे काळे सावट पसरले आहे. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक सेन्सेक्स १८३७ अंकांनी कोसळून ७२,६९६ वर बंद झाला, तर निफ्टी ६०२ अंकांच्या घसरणीसह २२,५१३ वर स्थिरावला. या महाभयंकर पडझडीमुळे गुंतवणूकदारांची एकाच दिवसात तब्बल १५ लाख कोटी रुपयांची मालमत्ता खाक झाली आहे.

बाजारातील पडझडीचे 'विदारक' चित्र

  • आजची घसरण किती व्यापक होती, हे 'ॲडव्हान्स-डिक्लाईन' रेश्योवरून स्पष्ट होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा रेश्यो १:१४ असा होता; याचाच अर्थ बाजारात प्रत्येक १ वाढणाऱ्या शेअरमागे १४ शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळाली. 
  • बँकिंग क्षेत्र भुईसपाट : निफ्टी बँक १९८९ अंकांनी तुटून ५१,४३८ वर बंद झाला.
  • मिडकॅपला फटका : मिडकॅप इंडेक्समध्येही २,१३८ अंकांची मोठी घसरण होऊन तो ५२,७१८ वर आला.
  • सुरक्षित गुंतवणूकही धोक्यात : आश्चर्यकारक बाब म्हणजे, संकटाच्या काळात सुरक्षित मानले जाणारे सोने आणि चांदी देखील आज ७ ते ११ टक्क्यांनी कोसळले. यामुळे या वर्षातील सोन्या-चांदीचा संपूर्ण परतावा शून्यावर आला आहे.

घसरणीची ६ प्रमुख कारणे

  1. कच्च्या तेलाचा भडका : ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ११५ डॉलरच्या जवळ पोहोचल्याने महागाई वाढण्याची धास्ती निर्माण झाली आहे.
  2. परकीय गुंतवणूकदारांची पळापळ : मार्च महिन्यात आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी ९०,१५२ कोटी रुपयांची प्रचंड विक्री केली आहे.
  3. 'इंडिया विक्स'मध्ये उसळी : भीतीचा निर्देशांक १५ टक्क्यांनी वाढून २६ वर पोहोचला आहे, जे बाजारातील तीव्र अनिश्चिततेचे लक्षण आहे.
  4. जागतिक तणाव : अमेरिका-इराण थेट संघर्षाच्या शक्यतेने जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका वाढला आहे.
  5. रुपयाची ऐतिहासिक घसरण : डॉलरच्या तुलनेत रुपया ९४ या विक्रमी नीचांकी स्तरावर गेल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
  6. बॉण्ड यील्डमध्ये वाढ : १० वर्षांच्या सरकारी बॉण्डचा परतावा ६.८०% च्या वर गेला आहे, जो व्याजदरात वाढ होण्याचे संकेत देत आहे.

कोणी गमावले, कोणी वाचवले?

  • सर्वात जास्त फटका : ऑईल आणि गॅस कंपन्यांवर सर्वाधिक दबाव दिसून आला. HPCL, BPCL, IOC आणि पेट्रोनेट एलएनजीचे शेअर्स ४% ते ८% पर्यंत तुटले.
  • रिअल इस्टेट : व्याजदर वाढण्याच्या भीतीने लोढासारखे शेअर्स ९ टक्क्यांनी घसरले.
  • आयटी क्षेत्राची झुंज : रुपया कमकुवत झाल्याचा फायदा आयटी क्षेत्राला मिळतो, त्यामुळे या क्षेत्रातील काही शेअर्स हिरव्या निशाणीत बंद झाले.
  • पॉवर ग्रीड : दिवसाच्या नीचांकी स्तरावरून या शेअरने रिकव्हरी दाखवली, ज्याला कंपनीचे 'कॅपिटल एक्स्पेंडिचर' गाईडन्स कारणीभूत ठरले.

गुंतवणूकदारांनी काय करावे? 
युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत गुंतवणूकदारांचे तब्बल ५० लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. सध्याचा बाजार हा केवळ 'सेन्टीमेंट्स'वर चालत असून तांत्रिक निकष बाजूला पडले आहेत. जोपर्यंत पश्चिम आशियातून तणाव निवळल्याचे ठोस संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत बाजारात मोठी खरेदी करणे जोखमीचे ठरेल. किरकोळ गुंतवणूकदारांनी अशा वेळी घाबरून विक्री करण्यापेक्षा दर्जेदार शेअर्समध्ये संयम बाळगणे आवश्यक आहे.

वाचा - जर्मनीमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा! मेकॅनिकपासून फायनान्सपर्यंत सर्व क्षेत्रांत संधी; १ कोटींपर्यंत मिळतोय पगार

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : वैश्विक तनाव के बीच बाजार में गिरावट, निवेशकों को भारी नुकसान

Web Summary : मध्य पूर्व तनाव के कारण भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट, ₹15 लाख करोड़ का नुकसान। तेल की कीमतें बढ़ीं, विदेशी निवेशकों ने पलायन किया, और रुपया कमजोर हुआ, जिससे व्यापक नुकसान हुआ। निवेशकों को धैर्य रखने की सलाह।

Web Title : Investors Lose Billions as Market Crashes Amid Global Tensions

Web Summary : Indian stock market crashes due to Middle East tensions, wiping out ₹15 lakh crore. Oil prices surge, foreign investors flee, and rupee weakens, causing widespread losses. Gold and silver also fall. Investors advised to remain patient.