Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेबीने काढली दलालाला नोटीस

सेबीने काढली दलालाला नोटीस

शेअरबाजारामध्ये परकीय वित्तसंस्था मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत असल्याची चर्चा असतानाच शुक्रवारी एका भारतीयाने दोन हजार कोटी रुपयांची खरेदी केल्याचे सेबीच्या लक्षात आले आहे.

By admin | Updated: May 14, 2014 04:52 IST2014-05-14T03:38:28+5:302014-05-14T04:52:08+5:30

शेअरबाजारामध्ये परकीय वित्तसंस्था मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत असल्याची चर्चा असतानाच शुक्रवारी एका भारतीयाने दोन हजार कोटी रुपयांची खरेदी केल्याचे सेबीच्या लक्षात आले आहे.

SEBI notice issued to Dalal | सेबीने काढली दलालाला नोटीस

सेबीने काढली दलालाला नोटीस

नवी दिल्ली : शेअरबाजारामध्ये परकीय वित्तसंस्था मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत असल्याची चर्चा असतानाच शुक्रवारी एका भारतीयाने दोन हजार कोटी रुपयांची खरेदी केल्याचे भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळाच्या (सेबी) लक्षात आले आहे. त्यासंदर्भात सेबीने एका शेअर दलालाला नोटीस बजावली आहे. सेबीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, शुक्रवारी एका भारतीयाने शेअर बाजारामध्ये दोन हजार कोटींची समभाग खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यासंदर्भातील स्पष्टीकरण मागविणारी नोटीस सेबीने एका दलालाला बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती पूर्वीपासून छोट्या प्रमाणात व्यवहार करीत होती. शुक्रवारी मात्र मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचे सेबीच्या शोधपथकाला आढळून आले आहे. त्यामुळे या व्यवहारांची माहिती संबंधित दलालाकडे मागणारी नोटीस बजावण्यात आली आहे. शेअर बाजारात मोठी तेजी आल्यामुळे बाजारात होणार्‍या सर्वच व्यवहारांवर सेबीची बारीक नजर आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) यापुढेही बाजारात काही वेगळ्या घडामोडी घडल्यास सेबी त्याचीही चौकशी करू शकते, असेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: SEBI notice issued to Dalal