Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एसएमएस-व्हाटस् अॅपवर सेबीची नजर

एसएमएस-व्हाटस् अॅपवर सेबीची नजर

शेअर बाजार नियामक सेबीने मोबाईल एसएमएस आणि व्हाटस् अॅपद्वारे संशयास्पद गुंतवणुकीसंबंधी जोरदार तपास सुरू केला आहे.

By admin | Updated: June 6, 2014 21:54 IST2014-06-06T21:54:03+5:302014-06-06T21:54:03+5:30

शेअर बाजार नियामक सेबीने मोबाईल एसएमएस आणि व्हाटस् अॅपद्वारे संशयास्पद गुंतवणुकीसंबंधी जोरदार तपास सुरू केला आहे.

Sebi eye on SMS-Whatsapp app | एसएमएस-व्हाटस् अॅपवर सेबीची नजर

एसएमएस-व्हाटस् अॅपवर सेबीची नजर

>नवी दिल्ली : शेअर बाजार नियामक सेबीने मोबाईल एसएमएस आणि व्हाटस् अॅपद्वारे संशयास्पद गुंतवणुकीसंबंधी जोरदार तपास सुरू केला आहे. मोबाईल एसएमएस आणि व्हाटस् अॅप मॅसेजद्वारे सुरुवातीला गुंतवणूक केल्यानंतर त्या मोबदल्यात मोठा नफा मिळण्याचे आमिष देण्यात आले होते.
सेबीने मन्सूर रफिक खांडा आणि फिरोज रफिक खांडा या दोघांना गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्यावर बंदी आणली आहे. दोघेही व्हाटस् अॅप आणि मोबाईल एसएमएसद्वारे गुंतवणुकीचा सल्ला देताना आढळून आले होते. त्यानंतर सेबीने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. सेबीने दोघांच्या संबंधित कंपनीच्या विरोधात अंतरिम आदेश जारी केला. यात म्हटले आहे की, दोघांनीही सल्लागार रूपाने काम करणो बंद करावे. तसेच विना नोंदणी शेअर बाजारात कोणताही व्यवहार करू 
नये.
सेबीने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले. तसेच या दोघांचीही नावे इम्तियाज हनीफ खांडा आणि वली ममद हबीब घनीवाले प्रकरणाशी मिळतेजुळते आहेत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीसुद्धा सारख्याच आहेत. या प्रकरणात सुद्धा सेबीने ऑगस्ट 2क्13 व डिसेंबर 2क्13 मध्ये त्यांना बाजारापासून दूर ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. ज्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे काय, याची चाचपणी सेबीने केली.
यापूर्वी या प्रकरणात तक्रारी मिळाल्यानंतर सेबीने संबंधित मोबाईल फोनचा तपास सुरू केला. यात वेबसाईटच्या माध्यमातून रक्कम अदा करण्यास सांगण्यात आले होते. यानंतर नियामकाने सूरतचे रहिवासी मन्सूर रफिक खांडा आणि फिरोज रफिक खांडा यांच्याकडे मोर्चा वळविला. बँक खात्यातून जेथे पैसे जमा करण्यास सांगितले होते, तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे सेबीने तपास केला.
सेबीच्या मते हे दोघेही नियामकाच्या मंजुरीविना गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करीत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4वॉटस्अॅप किंवा एसएमएसवरून जी माहिती फिरत आहे, त्याची चौकशी सेबीने सुरू केली आहे. या चौकशीत एखादी व्यक्ती अथवा कंपनी दोषी आढळली तर, त्या विरोधात कारवाई करण्याचे दोन पर्याय सेबीकडे आहेत. 
 
4 अशी माहिती कंपनीतर्फे पसरविण्यात येत असेल तर सेबीच्या स्वत:च्या अधिकारात त्या कंपनीवर कारवाई करू शकेल तसेच, एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करून रीतसर फौजदारी कारवाई करू शकेल. 

Web Title: Sebi eye on SMS-Whatsapp app