lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रूपीच्या १३८ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच, शोध घेऊन कारवाई

रूपीच्या १३८ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच, शोध घेऊन कारवाई

आर्थिक अनियमिततेमुळे रूपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 05:51 AM2020-09-05T05:51:13+5:302020-09-05T05:51:26+5:30

आर्थिक अनियमिततेमुळे रूपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत.

Search and take action on the assets of 138 arrears of Rupee Co bank | रूपीच्या १३८ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच, शोध घेऊन कारवाई

रूपीच्या १३८ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच, शोध घेऊन कारवाई

- विशाल शिर्के
पिंपरी (पुणे) : रूपी को-आॅपरेटिव्ह बँकेने १३८ थकबाकीदारांची मालमत्ता शोधून, त्यावर टाच आणण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडे शंभर कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असून, ९४.३८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कर्जाचा बोजा चढविण्यात आला आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे रूपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. १ लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेले खातेदार सुमारे ४ लाख ७० हजार आणि एक लाखांवरील ठेवीदार-खातेदारांची संख्या सुमारे २७ हजार इतकी आहे. एक लाखांवरील ठेवी या साडेनऊशे कोटी रुपयांहून अधिक आहेत. तर, एक लाखापर्यंत असलेल्या ठेवी तीनशे कोटी रुपयांच्या आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये रूपी बँकेचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आरबीआयकडे प्रलंबित आहे. दरम्यान, बँक प्रशासनानेदेखील जुन्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. कोरोनामुळे (कोविड-१९) ही मोहीम काहीशी संथ झाली असली तरी १३८ थकबाकीदारांची मालमत्ता शोधून त्यावर टाच आणण्यात आली. या थकबाकीदारांकडे बँकेची तब्बल १०४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी ९४ कोटी ३८ लाख रुपयांच्या मालमत्ता शोधून त्यावर टाच आणली आहे. त्यात सदनिका, बंगला, जमीन, दुकाने, कार्यालये अशा स्वरूपाच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता त्यांना परस्पर विकता येणार नाहीत. कर्जबुडव्यांच्या जामीनदारांकडे मालमत्तेबाबत चौकशी केली जाते. मालमत्तेचा शोध घेऊन त्यावर टाच आणली जाते.

अपत्याच्या नावे बेकायदेशीर मालमत्ता
कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार काहीवेळा १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या नावावर मालमत्ता दाखवितात. अशा प्रकरणामध्ये बँक फौजदारी दावा करून संबंधित व्यवहार बेकायदेशीर असल्याचे दाखवून देते. त्यानंतर संबंधित मालमत्तेवर बोजा चढविला जातो. अशीच कारवाई गृहिणीच्या नावे केलेल्या मालमत्तेच्या बाबतही केली जाते. मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया केली जाते, असे रुपी बँकेचे महाव्यवस्थापक नितीन लोखंडे यांनी सांगितले.

Web Title: Search and take action on the assets of 138 arrears of Rupee Co bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.