Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सॅमसंगचे विनीत तनेजा मायक्रोमॅक्सच्या सीईओपदी

सॅमसंगचे विनीत तनेजा मायक्रोमॅक्सच्या सीईओपदी

सॅमसंग इंडियाचे मोबाईल व आयटी उद्योगाचे प्रमुख विनीत तनेजा यांनी सॅमसंगला सोडचिठ्ठी दिली असून तनेजा हे मायक्रोमॅक्स कंपनीत सीईओपदावर रुजू होणार आहेत.

By admin | Updated: May 25, 2014 15:02 IST2014-05-25T15:01:35+5:302014-05-25T15:02:45+5:30

सॅमसंग इंडियाचे मोबाईल व आयटी उद्योगाचे प्रमुख विनीत तनेजा यांनी सॅमसंगला सोडचिठ्ठी दिली असून तनेजा हे मायक्रोमॅक्स कंपनीत सीईओपदावर रुजू होणार आहेत.

Samsung's Vineet Taneja as Micromax CEO | सॅमसंगचे विनीत तनेजा मायक्रोमॅक्सच्या सीईओपदी

सॅमसंगचे विनीत तनेजा मायक्रोमॅक्सच्या सीईओपदी

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २५ - भारतात मोबाईल हॅँडसेट कंपन्यांमध्ये चढाओढ सुरु असतानाच सॅमसंग इंडियाचे मोबाईल व आयटी उद्योगाचे प्रमुख विनीत तनेजा यांनी सॅमसंगला सोडचिठ्ठी दिली असून तनेजा हे मायक्रोमॅक्स कंपनीत सीईओपदावर रुजू होणार आहेत. तनेजांनी मायक्रोमॅक्सची वाट धरल्याने मायक्रोमॅक्सचे अच्छे दिन आ गये अशी प्रतिक्रिया उद्योग जगतात व्यक्त होत आहे. 
भारतातील स्मार्टफोन मोबाईल युजर्सची संख्या दिवसेगणिक वाढत असल्याने मोबाईल हँडसेट कंपन्यांमधील स्पर्धाही वाढली आहे. जगभराप्रमाणेच भारतातही मोबाईल उद्योगात सॅमसंगचा वरचष्मा आहे. तर भारतीय कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या मायक्रोमॅक्स दुस-या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर सॅमसंग इंडियाचे प्रमुख विनीत तनेजा यांची मायक्रोमॅक्सच्या सीईओपदी निवड झाल्याने मायक्रोमॅक्ससाठी 'अच्छे दिन' येतील अशी आशा निर्माण झाली आहे. २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले तनेजा हे नोकिया, हिंदूस्तान लिव्हर, भारती एअरटेल, सॅमसंग अशा विविध कंपन्यांमध्ये वरिष्ठ कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. आयआयटी रुडकी येथून इंजिनिअरिंग करणा-या तनेजा यांनी आयआयएम कोलकाताचे माजी विद्यार्थी आहेत. मायक्रोमॅक्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर आता कंपनीची भारतातील स्थिती आणखी भक्कम करण्यावर भर देऊ' अशी प्रतिक्रिया तनेजा यांनी दिली आहे. 
मायक्रोमॅक्सचे तत्कालीन सीईओ दीपक मल्होत्रा यांनी गेल्यावर्षी वैयक्तिक कारण पुढे करुन कंपनीच्या सीईओपदावरुन राजीनामा दिला होता. यानंतर हे पद रिक्तच होते. कंपनीचे सहसंस्थापक राहुल शर्मा या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. आता तनेजा मायक्रोमॅक्समध्ये आल्याने कंपनीच्या आगामी काळातील वाटचालीविषयी उद्योग विश्वात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतातील मोबाईल हँडसेट जगतामध्ये सॅमसंगचा वाटा ३८ टक्के आहे. तर त्याखालोखाल मायक्रोमॅक्स (१६ टक्के), कार्बन (१० टक्के), सोनी (५ टक्के), आणि लाव्हा (४.७टक्के) यांचा क्रमांक लागतो. 

Web Title: Samsung's Vineet Taneja as Micromax CEO