Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रशियानं भारतासाठी उघडली कच्च्या तेलाची टाकी; पण प्रत्येक बॅरलवर वसूल केला जातोय प्रीमिअम चार्ज

रशियानं भारतासाठी उघडली कच्च्या तेलाची टाकी; पण प्रत्येक बॅरलवर वसूल केला जातोय प्रीमिअम चार्ज

Russian Crude Oil: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १२० डॉलरच्या जवळ पोहोचला होता,

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:25 IST2026-03-12T11:24:28+5:302026-03-12T11:25:41+5:30

Russian Crude Oil: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १२० डॉलरच्या जवळ पोहोचला होता,

Russia opens crude oil tank for India but premium charge is being collected on every barrel crude oil petrol diesel price | रशियानं भारतासाठी उघडली कच्च्या तेलाची टाकी; पण प्रत्येक बॅरलवर वसूल केला जातोय प्रीमिअम चार्ज

रशियानं भारतासाठी उघडली कच्च्या तेलाची टाकी; पण प्रत्येक बॅरलवर वसूल केला जातोय प्रीमिअम चार्ज

Russian Crude Oil: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १२० डॉलरच्या जवळ पोहोचला होता, जो गेल्या चार वर्षांतील उच्चांकी स्तर आहे. भारताचा सुमारे ५५% तेल पुरवठा होर्मुजच्या खाडीतून होत होता, परंतु सध्या तिथून जहाजांची ये-जा बंद आहे. या कठीण परिस्थितीत, ६ मार्च रोजी अमेरिकेनं भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सवलत दिली होती. 'ब्लूमबर्ग'च्या रिपोर्टनुसार, या काळात भारतानं रशियाकडून ३० दशलक्ष बॅरल कच्चं तेल खरेदी केलं आहे.

युक्रेन युद्धानंतर रशिया भारतासाठी कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार बनला होता. गेल्या वर्षाच्या मध्यापर्यंत भारत रशियाकडून दररोज २ दशलक्ष बॅरलहून अधिक तेल आयात करत होता. मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे भारतानं रशियन तेलाची खरेदी कमी करून सौदी अरेबिया आणि इराककडून तेल घेण्यास सुरुवात केली होती. आता पश्चिम आशियातील संकटामुळे पुरवठा विस्कळीत झाला असताना, अमेरिकेनं दिलेल्या ३० दिवसांच्या सवलतीचा भारतानं वापर केला आहे.

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; २ दिवसांत Silver मध्ये १० हजारांची घसरण, Gold चे दर काय? पाहा

कोणत्या कंपन्यांनी खरेदी केलं रशियन तेल?

सूत्रांच्या माहितीनुसार, इंडियन ऑइल (IOC) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) यांनी स्पॉट मार्केटमधून रशियन कच्च्या तेलाचे सर्व न विकलेले कार्गो खरेदी केले आहेत. यामध्ये 'युराल', 'ईएसपीओ' आणि 'Varandey' ग्रेडच्या तेलाचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे रशियन तेल सध्या ब्रेंट क्रूडच्या तुलनेत २ ते ८ डॉलर प्रीमियम देऊन खरेदी करावे लागत आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी हेच तेल सवलतीच्या दरात मिळत होतं.

पर्यायी मार्गांचा वापर आणि सरकारची भूमिका

ट्रेडर्सच्या मते, इंडियन ऑइल आणि रिलायन्सनं मोठ्या प्रमाणावर खरेदी केली असली तरी दोन्ही कंपन्यांनी यावर अधिकृत भाष्य केलेलं नाही. दरम्यान, भारत सरकारचे म्हणणं आहे की सरकारी तेल कंपन्या विविध स्त्रोतांकडून कच्चं तेल खरेदी करत आहेत. भारताचा सुमारे ७०% कच्च्या तेलाचा पुरवठा आता होर्मुजला वळसा घालून इतर मार्गांनी येत आहे.

Web Title : रूस ने भारत के लिए तेल खोला, लेकिन प्रीमियम वसूला

Web Summary : अमेरिका की छूट के बाद भारत का रूसी कच्चे तेल का आयात बढ़ा। आईओसी और आरआईएल ने उपलब्ध कार्गो खरीदा। पश्चिम एशिया में आपूर्ति बाधित होने से तेल पर प्रीमियम लगा, जबकि पहले छूट मिलती थी। भारत होर्मुज जलडमरूमध्य से बचकर स्रोत खोज रहा है।

Web Title : Russia Opens Oil Tap for India, But Charges Premium

Web Summary : India's Russian crude oil imports surged after US sanctions eased, with IOC and RIL buying up available cargo. However, the oil now carries a premium due to disrupted supplies in West Asia, contrasting previous discounts. India seeks diverse sources, circumventing Hormuz Strait.