Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कंपन्यांचे बाजार भांडवल घेणार उसळी

कंपन्यांचे बाजार भांडवल घेणार उसळी

गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीचा परिणाम म्हणून या आठवडाअखेरीस शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाजार भांडवलाच्या मूल्यात मोठी वाढ होईल.

By admin | Updated: May 14, 2014 04:49 IST2014-05-14T03:44:04+5:302014-05-14T04:49:32+5:30

गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीचा परिणाम म्हणून या आठवडाअखेरीस शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाजार भांडवलाच्या मूल्यात मोठी वाढ होईल.

Rising market capitalization of companies | कंपन्यांचे बाजार भांडवल घेणार उसळी

कंपन्यांचे बाजार भांडवल घेणार उसळी

मुंबई : गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीचा परिणाम म्हणून या आठवडाअखेरीस शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाजार भांडवलाच्या मूल्यात मोठी वाढ होईल. गेल्या आठवड्यात तेजी असली तरी बाजारात उसळी म्हणता येईल, असे वातावरण नव्हते, तरीही सेन्सेक्समधील मोठ्या ७ कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल ८४,४९४ कोटी रुपयांची वाढ झाली होती. या आठवड्यात पहिल्या दोन दिवसांतच शेअर बाजाराने २४ हजार अंकांच्या पातळीला स्पर्श केला आहे. त्याचा परिणाम बाजार भांडवलाच्या वाढीवर होईल. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात २३ हजार अंशांच्या सर्वोच्चांकाला स्पर्श केला होता. त्याचा सर्वाधिक फायदा सेन्सेक्स श्रेणीतील सात कंपन्यांना झाला होता. या कंपन्यांच्या बाजारमूल्यात तब्बल ८४ हजार ४९४ कोटी रुपयांची वाढ झाली होती. गेल्या आठवड्यातील तेजीचा सर्वाधिक फायदा हा रिलायन्स आणि ओएनजीसीच्या समभागांना झाला असून, रिलायन्सच्या मूल्यात २२,३१९ कोटी रुपयांची वाढ होत ते तीन लाख २२ हजार ३६९ कोटी ६७ लाख रुपयांवर पोहोचले. तेल उद्योगातील अग्रगण्य कंपनी ओएनजीसीच्या बाजारमूल्यामध्ये १५ हजार ९५६ कोटी रुपयांची वाढ होत ते दोन लाख ९७ हजार ५१७ कोटी १७ लाख रुपयांवर पोहोचले. गेल्या आठवड्यात रिलायन्स आणि ओएनजीसीपाठोपाठ आयटीसी आणि एचडीएफसी बँक या दोन दिग्गज कंपन्यांच्या बाजारमूल्यातही लक्षणीय वाढ झाली होती. आयटीसीच्या बाजारमूल्यामध्ये ४,२५५ कोटी ४७ लाख रुपयांची वाढ होत ते दोन लाख ७४ हजार ७८२ कोटी ४७ लाख रुपयांवर पोहोचले. एचडीएफसी बँकेच्या ९६८८ कोटी ४१ लाख रुपयांची वाढ होत ते एक लाख ८१ हजार ८०६ कोटी ४१ लाख रुपयांवर पोहोचले. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मूल्यातही ९७४७ कोटी ९४ लाख रुपयांची वाढ होत ते चार लाख २३ हजार ३२० कोटी २९ लाख रुपयांवर पोहोचले. येत्या आठवड्याच्या अखेरीस यात मोठी वाढ होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Rising market capitalization of companies