Reliance Industries Share Price : गेल्या दोन दिवसात शेअर बाजारात मोठी चढउतार पाहायला मिळाली. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले. अशा परिस्थितीत मूल्यांकनाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. आज आरआयएलचा शेअर १.५% च्या उसळीसह १,५५९.६० रुपये या पातळीवर पोहोचला. रिलायन्सच्या शेअर्समधील ही तेजी जागतिक ब्रोकरेज फर्म जे.पी. मॉर्गनने दिलेल्या 'ओव्हरवेट' रेटिंगनंतर आली आहे.
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी
ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये रिलायन्सच्या मजबूत वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. जे.पी. मॉर्गनने रिलायन्सच्या शेअर्ससाठी १,७२७ रुपये प्रति शेअर इतकी लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. याचा अर्थ सध्याच्या किंमतीपेक्षा शेअरमध्ये सुमारे ११ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. रिलायन्सच्या शेअर्सने या वर्षी २७ टक्क्यांची दमदार वाढ नोंदवली आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरने ४% आणि ६ महिन्यांत ८% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
ब्रोकरेज फर्मचे महत्त्वाचे मुद्दे
अमेरिकन ब्रोकरेज फर्म जे.पी. मॉर्गनने रिलायन्सच्या स्टॉकला 'ओव्हरवेट' रेटिंग देताना खालील मुद्दे हायलाइट केले आहेत.
आकर्षक मूल्यांकन : डी-मार्ट आणि भारती एअरटेल यांसारख्या इतर मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्सचा शेअर अजूनही आकर्षक मूल्यांकनावर ट्रेड करत आहे.
डिस्काउंट: कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये अजूनही सुमारे १५% होल्डिंग कंपनी डिस्काउंट लागू आहे, म्हणजे बाजारात कंपनीला पूर्ण मूल्य मिळत नाहीये.
उत्पन्नावरील दबाव कमी: गेल्या दोन वर्षांत रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायात मार्जिन कमी झाल्यामुळे उत्पन्नावर आलेला दबाव आता दूर झाला आहे. रिफायनिंग मार्जिनमध्ये चांगली वाढ झाली आहे.
२०२६ मधील मोठे ट्रिगर
विदेशी ब्रोकरेज फर्मला २०२६ मध्ये रिलायन्सच्या वाढीसाठी अनेक मोठे घटक दिसत आहेत.
- जिओचा IPO : जिओचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता.
- टॅरिफ वाढ : टेलिकॉम क्षेत्रात टॅरिफ वाढ होण्याची मोठी शक्यता.
- न्यू एनर्जी प्रोजेक्ट्स : न्यू एनर्जी प्रकल्पांना मिळणारी गती.
- रिटेल व्यवसाय : रिटेल व्यवसायात स्थिरता आणि चांगली वाढ.
वाचा - GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
या सकारात्मक ट्रिगर्समुळे, रिलायन्सचा शेअर मध्यम ते दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
