Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझव्र्ह बॅँकेचे लक्ष आता टर्म रेपोकडे

रिझव्र्ह बॅँकेचे लक्ष आता टर्म रेपोकडे

रोखतेची समस्या निर्माण होण्याची भीती असल्याने भारतीय रिझव्र्ह बॅँकेने आता टर्म रेपोकडे लक्ष केंद्रित करणो सुरू केले आहे.

By admin | Updated: June 6, 2014 21:50 IST2014-06-06T21:50:01+5:302014-06-06T21:50:01+5:30

रोखतेची समस्या निर्माण होण्याची भीती असल्याने भारतीय रिझव्र्ह बॅँकेने आता टर्म रेपोकडे लक्ष केंद्रित करणो सुरू केले आहे.

Reserve Bank of India's focus now on term repo | रिझव्र्ह बॅँकेचे लक्ष आता टर्म रेपोकडे

रिझव्र्ह बॅँकेचे लक्ष आता टर्म रेपोकडे

>नवी दिल्ली : पैशांची जेव्हा अतिशय निकड भासते तेव्हा बॅँकेकडून कॅश क्रेडिटची सुविधा ही अतिशय उपयुक्त मानली जाते; मात्र यामुळे रोखतेची समस्या निर्माण होण्याची भीती असल्याने भारतीय रिझव्र्ह बॅँकेने आता टर्म रेपोकडे लक्ष केंद्रित करणो सुरू केले आहे. त्यामुळे आगामी काळात कॅश क्रेडिटपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे.
बॅँकांनी आपल्या ग्राहकांना केवळ एका दिवसाची कॅश क्रेडिट सुविधा देण्यापेक्षा टर्म रेपोचा वापर करावा, अशी रिझव्र्ह बॅँकेची अपेक्षा आहे. यामुळे अर्थव्यवस्थेतील रोखतेची समस्या निर्माण होणो कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय चलन बाजारात भारतीय चलन स्थिर राहील, असा बॅँकेचा अंदाज आहे.
बॅँकांनी आपल्या ग्राहकांना दिलेल्या कॅश क्रेडिटच्या सुविधेमुळे बॅँकांना लिक्वि डिटी अॅडजस्टमेंट फॅसिलिटीच्या माध्यमातून रिझव्र्ह बॅँकेकडून रक्कम उचलावी लागते. या रकमेवर रेपो दराप्रमाणो व्याजाची आकारणी होते. जर ही रक्कम एकाच दिवसात परत आली, तर उर्वरित काळ ती बॅँकेत पडून राहते आणि अर्थव्यवस्थेतील पैसा वाढतो; मात्र मुदतीनंतर ही रक्कम परत गेल्यावर रोखतेची समस्या निर्माण होते.
या समस्येपासून मुक्ती मिळावी, यासाठी भारतीय रिझव्र्ह बॅँकेने आता टर्म रेपोकडे अधिक लक्ष दिले आहे. रिझव्र्ह बॅँकेने सात आणि 14 दिवसांच्या मुदतीने कॅश क्रेडिटची सुविधा बॅँकांना उपलब्ध करून दिली आहे. जगभरात कोठेही अशा प्रकारची कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध नाही. त्याऐवजी निश्चित मुदतीचे कर्ज हे अधिक स्थिर असल्याचे मत काही बॅँकांच्या प्रमुखांनी व्यक्त केले आहे. अशा प्रकाराने कर्ज दिले गेल्यास रोखतेचे व्यवस्थापन करणो सुलभ होऊ शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
-बॅँकांना सुविधाजनक व्हावे यासाठी भारतीय रिझव्र्ह बॅँकेने सात दिवस आणि 14 दिवसांसाठी टर्म रेपो विंडो सुरू केली आहे.
-बॅँका आपल्या दिवसाच्या रोखतेची मागणी पूर्ण करण्यासाठी मागणीच्या एक टक्का रक्कम घेऊ शकतील. 
 
-निर्यात कर्ज फेरखरेदी (एक्स्पोर्ट क्रेडिट रिफायनान्स)ची मर्यादा 5क् टक्क्यांवरून 32 टक्क्यांर्पयत कमी करण्यात आले आहे.
-बॅँकांना निश्चित रोखता मिळावी या उद्देशाने हे बदल भारतीय रिझव्र्ह बॅँकेतर्फे करण्यात येत आहे.

Web Title: Reserve Bank of India's focus now on term repo