Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्सची फोर जी सेवा डिसेंबरमध्ये

रिलायन्सची फोर जी सेवा डिसेंबरमध्ये

रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) तिची बहुप्रतीक्षित अशी फोर जी दूरसंचार सेवा येत्या डिसेंबरपासून देणार आहे. हा स्मार्ट फोन किमान ४ हजार

By admin | Updated: June 13, 2015 00:20 IST2015-06-13T00:20:07+5:302015-06-13T00:20:07+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) तिची बहुप्रतीक्षित अशी फोर जी दूरसंचार सेवा येत्या डिसेंबरपासून देणार आहे. हा स्मार्ट फोन किमान ४ हजार

Reliance's Four-G service in December | रिलायन्सची फोर जी सेवा डिसेंबरमध्ये

रिलायन्सची फोर जी सेवा डिसेंबरमध्ये

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) तिची बहुप्रतीक्षित अशी फोर जी दूरसंचार सेवा येत्या डिसेंबरपासून देणार आहे. हा स्मार्ट फोन किमान ४ हजार रुपयांना असेल व त्याचे महिन्याचे बिल ३००-५०० रुपये असेल असे आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी म्हटले.
अंबानी यांनी भागधारकांना सांगितले की, कंपनी येत्या १२ ते १८ महिन्यांमध्ये तेल आणि पेट्रोकेमिकल व्यवसाय, तसेच दूरसंचार या नव्या क्षेत्रातील २ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण करील. रिलायन्स जियो इन्फोकॉम नेटवर्कची चाचणी येत्या काही महिन्यांत करून डिसेंबरमध्ये व्यावसायिक सेवा उपलब्ध करून देणार आहे. फोर जी सेवेमुळे व्हॉईस व हायस्पीड डाटा सर्व्हिसेस (उदा. हाय डेन्सिटी टेलिव्हिजन) उपलब्ध होतील. व्हॉईस आणि डाटाची वाढती डिमांड लक्षात घेता ही सेवा देणारे फोर जी स्मार्ट फोन ४ हजारांपेक्षाही कमी किमतीत येत्या डिसेंबरपासून मिळतील, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स बातम्या आणि मनोरंजन सेवा देणारे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स आणणार आहे.

Web Title: Reliance's Four-G service in December