Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?

एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?

Reliance Share Tumbles : रिलायन्स इंडस्ट्रीजने मंगळवारी केलेल्या एका खुलाश्याने कंपनीच्या शेअर्सला मोठा फटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:32 IST2026-01-06T19:22:16+5:302026-01-06T19:32:50+5:30

Reliance Share Tumbles : रिलायन्स इंडस्ट्रीजने मंगळवारी केलेल्या एका खुलाश्याने कंपनीच्या शेअर्सला मोठा फटका बसला आहे.

Reliance Shares Plunge 4.5% After Trump's Tariff Warning: Biggest Drop in 7 Months | एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?

एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?

Reliance Share Tumbles : भारतीय शेअर बाजाराचा कणा मानल्या जाणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. रिलायन्सचा शेअर ४.५ टक्क्यांनी कोसळून १,५०७.६० रुपयांवर बंद झाला. ४ जून २०२४ नंतरची ही रिलायन्सच्या शेअरमधील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. या एकाच दिवसाच्या पडझडीमुळे कंपनीच्या बाजार मूल्यांकनात सुमारे १ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

घसरणीचे मुख्य कारण काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून थेट इशारा दिला आहे. "भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद न केल्यास भारतावर अधिक 'टॅरिफ' (अतिरिक्त कर) लावले जातील," या विधानाने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीने रिलायन्ससारख्या बलाढ्य कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली.

रिलायन्सचे स्पष्टीकरण : 'आम्ही रशियन तेल खरेदी करत नाही'
बाजारातील अफवा आणि दबाव पाहता रिलायन्सने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे, की रिलायन्सने गेल्या तीन महिन्यांपासून रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केलेली नाही. जानेवारी महिन्यातही रशियाकडून तेलाची कोणतीही डिलिव्हरी अपेक्षित नाही. जामनगरमधील 'एसईझेड' रिफायनरीमध्ये रशियन तेलाचे प्रोसेसिंग पूर्णपणे बंद करण्यात आले आहे, जेणेकरून युरोप आणि अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन होणार नाही.

रिफायनिंग गणितावर परिणाम?
रिलायन्सच्या जामनगर कॉम्प्लेक्समध्ये दोन रिफायनरी आहेत. यातील 'एसईझेड' युनिटमधून तयार होणारे इंधन प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेला निर्यात केले जाते. युरोपीय महासंघाने रशियन तेलापासून बनवलेल्या इंधनावर कडक निर्बंध लादले आहेत. रिलायन्सचा हा मोठा बाजार असल्याने कंपनीने आपल्या धोरणात बदल केला आहे.

वाचा - फक्त १ वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड घेताय? थांबा! राधिका गुप्ता यांनी सांगितला गुंतवणुकीचा 'सुरक्षित' मंत्र

रिलायन्सचे शेअर्स खरेदीची संधी?
शेअरमध्ये मोठी घसरण झाली असली, तरी अनेक दिग्गज ब्रोकरेज फर्म्स रिलायन्सच्या भविष्याबाबत सकारात्मक आहेत. बहुतांश ब्रोकरेजनी स्टॉकवर खरेदी करा रेटिंग कायम ठेवले आहे. तज्ज्ञांनी रिलायन्ससाठी १,६८५ रुपये प्रति शेअर हे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
 

Web Title : ट्रंप की चेतावनी के बाद रिलायंस के शेयर गिरे: निवेशक चिंतित?

Web Summary : ट्रंप की रूस से तेल आयात पर चेतावनी के बाद रिलायंस के शेयर गिरे। कंपनी ने स्पष्ट किया कि उसने हाल ही में रूसी तेल नहीं खरीदा है। गिरावट के बावजूद, ब्रोकरेज फर्म सकारात्मक हैं, और ₹1,685 के लक्ष्य मूल्य के साथ 'खरीदें' रेटिंग का सुझाव देते हैं।

Web Title : Reliance Shares Plunge After Trump's Warning: Investors Worried?

Web Summary : Reliance shares tumbled after Trump warned India on Russian oil imports. The company clarified it hasn't bought Russian oil recently. Despite the fall, brokerage firms remain positive, suggesting a 'buy' rating with a target price of ₹1,685.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.