Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर

मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर

reliance retail : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल ऑनलाइन बाजारात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स रिटेल, स्पेन्सर आणि मोअर सारख्या रिटेल कंपन्या नवीन डार्क स्टोअर्स उघडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:57 IST2025-05-18T15:55:36+5:302025-05-18T15:57:14+5:30

reliance retail : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल ऑनलाइन बाजारात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स रिटेल, स्पेन्सर आणि मोअर सारख्या रिटेल कंपन्या नवीन डार्क स्टोअर्स उघडत आहेत.

reliance retail more and spencers will open dark store | मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर

मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर

reliance retail : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत ज्या क्षेत्रात प्रवेश केला, तिथे वर्चस्व गाजवले आहे. टेलिकॉममध्ये जिओने काय केले, हे आपण पाहिलेच आहे. आता अंबानी यांची कंपनी ऑनलाइन किराणा बाजारात धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी रिलायन्स रिटेल (Reliance Retail) आणि स्पेन्सर (Spencer) आणि मोअर (More) सारख्या त्यांच्या रिटेल कंपन्या नवीन 'डार्क स्टोअर्स' उघडत आहेत. या कंपन्या झेप्टो (Zepto) आणि ब्लिंकिट (Blinkit) सारख्या ऑनलाइन किराणा क्षेत्रातील प्रतिस्पर्धकांना टक्कर देणार आहेत.

आजकाल ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart), झेप्टो आणि बिगबास्केट (Bigbasket) यांसारख्या जलद डिलिव्हरी करणाऱ्या प्लॅटफॉर्म्सनी मोठ्या शहरांमधील पारंपरिक किराणा दुकानांचा व्यवसाय जवळपास संपवला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुकेश अंबानींची कंपनी आता या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी नवीन डार्क स्टोअर्स उघडण्याचा विचार करत आहे. यापूर्वी मोअरने ४५ नवीन स्टोअर्स उघडले आहेत आणि आता ते आणखी १०० स्टोअर्स उघडणार आहेत.

काय आहेत हे डार्क स्टोअर्स?
डार्क स्टोअर्स म्हणजे लहान गोदामे. यांच्या माध्यमातून २-३ किलोमीटरच्या परिसरात अगदी कमी वेळेत डिलिव्हरी देणे शक्य होते. रिलायन्स रिटेलचे मोठे अधिकारी दिनेश तळुजा यांनी सांगितले की, कंपनीचे लक्ष्य ३० मिनिटांपेक्षा कमी वेळेत ऑनलाइन ऑर्डर पोहोचवणे आहे. यासाठी कंपनी अशा ठिकाणी डार्क स्टोअर्स उघडत आहे, जिथे भरपूर ऑर्डर्स मिळतात आणि सध्याच्या स्टोअर नेटवर्कमधून जलद डिलिव्हरी शक्य नाही. विशेष म्हणजे, भारतात अमेझॉन फ्रेशची (Amazon Fresh) सर्वात जास्त विक्री करणारी मोअर रिटेल देखील याच दिशेने पाऊल उचलत आहे.

ई-कॉमर्सचा वाढता दबदबा
नील्सनआयक्यूच्या (NielsenIQ) अहवालानुसार, यावर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत मोठ्या शहरांमध्ये ई-कॉमर्सचा वाटा वाढला आहे, ज्यामुळे किराणा आणि आधुनिक व्यापारावर परिणाम झाला आहे. ई-कॉमर्समध्ये तब्बल ४०% वाढ झाली आहे, तर पारंपरिक व्यापारात २.२% आणि आधुनिक व्यापारात ७.७% घट झाली आहे. ऑनलाइन खरेदीदारांची वाढती संख्या, लोकांची वाढलेली खरेदी क्षमता आणि मोठ्या ऑर्डर यामुळे ई-कॉमर्स वाढत आहे.

वाचा - टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...

स्पेन्सर रिटेलचे सीईओ अनुज सिंग म्हणाले की, डार्क स्टोअर्स त्यांची पहिली प्राथमिकता नसली तरी, त्यांनी कोलकात्यात एक छोटा प्रयोग सुरू केला आहे. जिथे ३० मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी स्टोअर्सची उपलब्धता कमी होती, तिथे डार्क स्टोअर उपयुक्त ठरत आहेत. रिलायन्स रिटेलच्या या धोरणामुळे केवळ जलद डिलिव्हरीच्या व्यवसायात वाढ होणार नाही, तर ग्राहकांना जलद आणि स्वस्त सेवा मिळून या क्षेत्राला आणखी चालना मिळू शकते. अंबानींच्या या नव्या चालीमुळे ऑनलाइन किराणा बाजारात मोठी स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: reliance retail more and spencers will open dark store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.