Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance Jio Affordable Plans: महिन्याकाठी 130 रुपये! Jio चे एकदाच 12 महिन्यांचे रिचार्ज करा; 336 दिवसांची व्हॅलिडीटी

Reliance Jio Affordable Plans: महिन्याकाठी 130 रुपये! Jio चे एकदाच 12 महिन्यांचे रिचार्ज करा; 336 दिवसांची व्हॅलिडीटी

कंपनीने अनेक सेगमेंटमध्ये प्लॅन्स विभागले आहेत. यामध्ये व्हॅल्यू सेगमेंटही आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 19:05 IST2022-07-06T19:05:12+5:302022-07-06T19:05:47+5:30

कंपनीने अनेक सेगमेंटमध्ये प्लॅन्स विभागले आहेत. यामध्ये व्हॅल्यू सेगमेंटही आहे.

Reliance Jio Affordable Plans: 130 per month! Recharge Jio 1559 once for 12 months; 336 days validity | Reliance Jio Affordable Plans: महिन्याकाठी 130 रुपये! Jio चे एकदाच 12 महिन्यांचे रिचार्ज करा; 336 दिवसांची व्हॅलिडीटी

Reliance Jio Affordable Plans: महिन्याकाठी 130 रुपये! Jio चे एकदाच 12 महिन्यांचे रिचार्ज करा; 336 दिवसांची व्हॅलिडीटी

टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने आपल्या युजर्ससाठी कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. वर्षाचे रिचार्ज करायचे असेल तर प्लॅन महागले आहेत. अशावेळी जिओने 1,559 रुपयांत 336 दिवस व्हॅलिडीटी असलेला प्लॅन आणला आहे. 

कंपनीने अनेक सेगमेंटमध्ये प्लॅन्स विभागले आहेत. यामध्ये व्हॅल्यू सेगमेंटही आहे. यामध्ये तीन प्लॅन्स आहेत, जे परवडणाऱ्या श्रेणीमध्ये येतात. यामध्ये एका वार्षिक प्लॅन आहे ज्याची किंमत 1,559 रुपये आहे. टेलिकॉम कंपन्या २८ दिवसांचा महिना पकडतात. म्हणजे १२ महिन्यात ते १३ महिन्यांचे पैसे आकारतात. यानुसार या प्लॅनची व्हॅलिडीटी ३३६ दिवस म्हणजेच १२ महिन्यांची आहे. 

दर महिन्याला म्हणजेच २८ दिवसांना 130 रुपये खर्च आहे. एकदम पैसे भरल्यास हा प्लॅन परवडू शकतो. या प्लॅनसोबत २४ जीबी डेटा दिला जातो. तो संपला की ६४ केबीपीएस स्पीड मिळतो. या प्लॅनसोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा मिळते. याशिवाय १२ महिन्यांसाठी युजरला 3600 एसएमएस मिळतात. सोबत JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सब्सक्रिप्शन दिले जातेय. 

यामध्ये आणखी एक प्लॅन आहे. परंतू तो जिओ फोनसाठी आहे. 899 रुपयांत 336 दिवसांची वैधता दिली जाते. यामध्ये २४ जीबी डेटा दिला जातो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग सुविधाही दिली जाते. दर २८ दिवसांसाठी ५० एसएमएस दिले जातात. 

Web Title: Reliance Jio Affordable Plans: 130 per month! Recharge Jio 1559 once for 12 months; 336 days validity