Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींचा शेअर बाजारात डबल धमाका; Jio नंतर 'या' कंपनीचा IPO आणणार

मुकेश अंबानींचा शेअर बाजारात डबल धमाका; Jio नंतर 'या' कंपनीचा IPO आणणार

Reliance IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी शेअर बाजारात दुहेरी धमाका करण्याच्या तयारीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:21 IST2025-09-16T18:20:58+5:302025-09-16T18:21:48+5:30

Reliance IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी शेअर बाजारात दुहेरी धमाका करण्याच्या तयारीत आहेत.

Reliance IPO: Mukesh Ambani's double bang in the stock market; After Jio, will bring this company IPO | मुकेश अंबानींचा शेअर बाजारात डबल धमाका; Jio नंतर 'या' कंपनीचा IPO आणणार

मुकेश अंबानींचा शेअर बाजारात डबल धमाका; Jio नंतर 'या' कंपनीचा IPO आणणार

Reliance IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानीशेअर बाजारात दुहेरी धमाका करण्याच्या तयारीत आहेत. अलीकडेच झालेल्या एजीएममध्ये त्यांनी रिलायन्स जिओचा IPO आणण्याची घोषणा केली होती. आता ताज्या माहितीनुसार, कंपनी 2027 मध्ये रिलायन्स रिटेलचाही IPO आणणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिस्टिंगच्या वेळी रिलायन्स रिटेलची व्हॅल्यू सुमारे 200 अब्ज डॉलर (16.7 लाख कोटी रुपये) इतकी असू शकते.

रिलायन्स रिटेलची योजना

रिलायन्सने आपली FMCG युनिट रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स रिलायन्स रिटेलमध्ये मर्ज केले आहे, ज्यामुळे ऑपरेशन्स अधिक मजबूत होतील. परफॉर्मन्स न करणारे स्टोअर्स बंद करून कंपनी आपला बिझनेस ऑप्टिमाईज करण्याच्या प्रयत्नात आहे. IPO मुळे GIC (सिंगापूर), अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, KKR, TPG आणि सिल्वर लेक सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांना एग्झिटची संधी मिळेल.

रिलायन्स रिटेल आपले ब्रँड्स रिलायन्स स्मार्ट, फ्रेशपिक, रिलायन्स डिजिटल, जिओमार्ट, रिलायन्स ट्रेंड्स, 7-इलेव्हन आणि रिलायन्स ज्वेल्स कायम ठेवेल. काही फॉरमॅट्स एकत्र करण्यावरही विचार सुरू आहे, मात्र तो अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

देशातील सर्वात मोठा IPO 

रिलायन्स जिओचा IPO भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरू शकतो. याची संभाव्य किंमत 13.5 लाख कोटी रुपये असू शकते. विविध आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाउसेसने जिओची किंमत वेगवेगळी ठरवली आहे. गोल्डमन सॅक्स – 154 अब्ज डॉलर, जेफरीज – 146 अब्ज डॉलर, मॅक्वेरी – 123 अब्ज डॉलर, MK – 121 अब्ज डॉलर. लिस्टिंगनंतर जिओची व्हॅल्यू 134-146 अब्ज डॉलर (11.2-12.19 लाख कोटी रुपये) दरम्यान राहू शकते, ज्यामुळे ही भारतातील टॉप-5 लिस्टेड कंपन्यांमध्ये समाविष्ट होईल.

रिलायन्स शेअर्सची स्थिती

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 0.46% वाढ होऊन किंमत ₹1,405.80 वर बंद झाली. गेल्या 6 महिन्यांत रिलायन्सच्या शेअर्समध्ये 13% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Reliance IPO: Mukesh Ambani's double bang in the stock market; After Jio, will bring this company IPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.