Operation Sindoor Trademark : भारतीय सैन्याने 'ओपरेशन सिंदूर' मोहीम राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत. भारतीय सैन्याने केलेल्या या कामगिरीचं देशभरातून कौतुक होत आहे. या घटनेवर लवकरच चित्रपट येईल, अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याचदरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (RIL) 'ऑपरेशन सिंदूर' नावाचा ट्रेडमार्क आपल्या नावे करण्यसाठी अर्ज केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. रिलायन्सच्या या निर्णयावर टीका सुरू झाल्यानंतर कंपनीने यावर निवदेन प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिलं आहे.
'ऑपरेशन सिंदूर' ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
रिलायन्स इंडस्ट्रीजचा 'ऑपरेशन सिंदूर' या शब्दाचे ट्रेडमार्क करण्याचा कोणताही हेतू नाही. हा शब्द आता राष्ट्रीय चेतनेचा भाग बनला असून तो भारतीय शौर्याचे प्रेरणादायी प्रतीक आहे. जिओ स्टुडिओज, हे रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक भाग आहे, त्याने त्याचा ट्रेडमार्क अर्ज मागे घेतला आहे. हा अर्ज एका कनिष्ठ व्यक्तीने अधिकृत परवानगीशिवाय दाखल केला होता.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्याचे सर्व हितधारक 'ऑपरेशन सिंदूर' चा खूप अभिमान बाळगतात. हे ऑपरेशन पाकिस्तान पुरस्कृत पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे आपल्या शूर सशस्त्र दलांनी दहशतवादाविरुद्ध केलेल्या निर्भीड लढ्याचे गौरवशाली यश आहे.
दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत रिलायन्स पूर्णपणे आपल्या सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभी आहे. 'इंडिया फर्स्ट' या आमच्या ब्रीदवाक्याप्रती आमची बांधिलकी अटळ आहे.
Reliance Industries has no intention of trademarking Operation Sindoor, a phrase which is now a part of the national consciousness as an evocative symbol of Indian bravery. Jio Studios, a unit of Reliance Industries, has withdrawn its trademark application, which was filed… pic.twitter.com/Nxwic58pf7
— ANI (@ANI) May 8, 2025
ट्रेडमार्क कसा मिळतो?
हे नाव यापूर्वी कोणी घेतलंय की नाही याची पडताळणी ट्रेडमार्क रजिस्ट्रीद्वारे केली जाते. जर कोणतीही हरकत आली नाही, तर सरकारच्या ट्रेडमार्क जनरलमध्ये हे छापलं जाईल. यानंतर ४ महिन्यांपर्यंत कोणत्याही व्यक्तीला हरकत असल्यास ती नोंदवता येईल. सर्वकाही ठीक असेल तर ट्रेडमार्क अर्जदाराला मिळतो.
वाचा - पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
आणखी कोणी केला अर्ज?
रिलायन्सव्यतिरिक्त मुंबईचे मुकेश चेतराम अग्रवाल, जम्मूचे ग्रुप कॅप्टन कमल सिंग (निवृत्त) आणि दिल्लीचे आलोक कोठारी यांनीही याच नावासाठी अर्ज केले आहेत.