Rekha Jhunjhunwala Stock: किरकोळ गुंतवणूकदाररेखा झुनझुनवाला यांच्यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर बारकाईने लक्ष ठेवतात, कारण या तज्ज्ञांकडे उत्तम ज्ञान, अनुभव आणि संशोधन असतं असं मानलं जातं. हे दिग्गज काय खरेदी करतात किंवा विकतात हे पाहून लहान गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे विचार, आत्मविश्वास आणि मार्गदर्शन मिळतं, ज्यामुळे ते देखील अशाच प्रकारचे गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास आणि जोखीम कमी करण्यास सक्षम होतात. या संदर्भात, 'ट्रेंडलाइन'च्या आकडेवारीवरून असं दिसून आलंय की, रेखा झुनझुनवाला यांनी मार्च तिमाहीत स्मॉलकॅप कंपनी राघव प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्सर्स (Raghav Productivity Enhancers) मधील आपली हिस्सा कमी केला आहे.
रेखा झुनझुनवाला यांनी किती हिस्सा विकला?
ट्रेंडलाइनवर उपलब्ध आकडेवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांनी मार्च तिमाहीत या स्मॉलकॅप कंपनीतील आपला ०.४४ टक्के हिस्सा विकला आहे. ही विक्री २ लाख ४ हजार ३८ शेअर्सच्या बरोबरीची आहे. या विक्रीनंतर, कंपनीतील रेखा झुनझुनवाला यांचा हिस्सा आता ४.३६ टक्क्यांवर आलाय. यापूर्वी त्यांच्याकडे कंपनीचा ४.८० टक्के हिस्सा होता.
आठवीनंतर शाळा सोडली, १६ वर्षी बनवलं App; आता २५ व्या वर्षी हर्षितानं अमेरिकेत केली कमाल
कंपनीचा शेअरहोल्डिंग पॅटर्न
कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, मार्च २०२५ पर्यंत प्रवर्तकांकडे (Promoters) ६२.९ टक्के हिस्सा होता. परदेशी गुंतवणूकदारांकडे ०.४ टक्के हिस्सा असून देशांतर्गत गुंतवणूकदारांकडे कोणताही हिस्सा नाही. दुसरीकडे, सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीचा ३६.७ टक्के हिस्सा होता.
कंपनीचे तिमाही निकाल
आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीनं २,८२७.५४ लाख रुपयांचा महसूल मिळवला आणि ६३५.२७ लाख रुपयांचा नफा कमावला आहे. हा नफा मागील तिमाहीतील ५७७.3४ लाख रुपयांच्या नफ्यापेक्षा जास्त आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीनं एकूण ८,३०८.८४ लाख रुपयांचा महसूल आणि २,२०७.१९ लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
