Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कमी दराने एलबीटी वसुल करा; आ. मेंडोन्सांची मागणी

कमी दराने एलबीटी वसुल करा; आ. मेंडोन्सांची मागणी

भाईंदर - राज्य शासनाने सुरु केलेला एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द करा व तो रद्द होईतो इतर पालिकांपेक्षा त्याची जास्त दराने या महानगरात होणारी वसूली थांबवून ती कमी दराने करा अशी मागणी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे केली आहे.

By admin | Updated: June 20, 2014 22:28 IST2014-06-20T22:28:00+5:302014-06-20T22:28:00+5:30

भाईंदर - राज्य शासनाने सुरु केलेला एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द करा व तो रद्द होईतो इतर पालिकांपेक्षा त्याची जास्त दराने या महानगरात होणारी वसूली थांबवून ती कमी दराने करा अशी मागणी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे केली आहे.

Recover LBT at a low rate; Come on. Mendon's demand | कमी दराने एलबीटी वसुल करा; आ. मेंडोन्सांची मागणी

कमी दराने एलबीटी वसुल करा; आ. मेंडोन्सांची मागणी

ईंदर - राज्य शासनाने सुरु केलेला एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द करा व तो रद्द होईतो इतर पालिकांपेक्षा त्याची जास्त दराने या महानगरात होणारी वसूली थांबवून ती कमी दराने करा अशी मागणी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे केली आहे.
नुकत्याच झालेल्या व्यापारी व पालिका प्रशासनाच्या बैठकीत एलबीटीचा दर शेजारील वसई-विरार पालिकेच्या धर्तीवर निि›त करण्याच्या मागणीसह व्हॅटवर १ टक्का अधिभार वसूल करण्याला व्यापार्‍यांनी अनुकूलता दाखविली. या पार्श्वभूमीवर आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी पालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन जास्त दराने वसुल करण्यात येणार्‍या एलबीटीचा दर कमी करुन व्यापार्‍यंा दिलासा देण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

नवीन उड्डाणपुलाची मागणी
भाईंदर - अलिकडेच वरसावे खाडीवरील पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली असली तरी अवघ्या ४० वर्षांत या पुलाला तडा गेल्याची घटना गंभीर असल्याने त्याला पर्याय म्हणुन नवीन ८ पदरी उड्डाणपुल बांधण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
१९६६ ते १९७० दरम्यान वरसावे खाडीवर २ पदरी उड्डाणपुल बांधण्यात आला. त्यानंतर त्याच्या लगतच नवीन २ पदरी उड्डाण पुल बांधल्यानंतर दोन्ही पुलांवर एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली. परंतु, जुन्या पुलाच्या एका गर्डरला केवळ ४० वर्षांतच तडा गेल्याचे २४ डिसेंबर २०१३ रोजी निदर्शनास आल्यानंतर हा पुल दुरुस्तीच्या कारणास्तव पुर्णत: बंद करण्यात आला होता. त्यामुळे येथील वाहतुक लगतच्या उड्डाण पुलावर वळविण्यात आली होती. या पुलावरुन दोन्ही बाजुकडील वाहतुकीसाठी एकेरी मार्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून पुलाच्या दोन्ही बाजंुकडील वाहतुकीला सुमारे तासभर एकाच जागी खोळंबून रहावे लागत होते. काही दिवसांपुर्वीच या पुलाची दुरुस्ती पुर्ण झाल्याने वाहतुक कोंडीची समस्या मार्गी लागली असली तरी या पुलाच्या काही भागांतही तडे जाण्याची भीती ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी वर्तविली आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्या पुलाला पर्याय म्हणुन नवीन ८ पदरी उड्डाण पुल बांधण्याची मागणी पाटील यांनी राज्य शासनाऐवजी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याने पाटील यांच्या मागणीबाबत अच्छे दिन येतील का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

(प्रतिनिधी)

एडीट केली टेणीसर

Web Title: Recover LBT at a low rate; Come on. Mendon's demand