lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI Policy Rate: RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरूवात, ग्राहकांच्या खिशावर पुन्हा ताण वाढणार?

RBI Policy Rate: RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरूवात, ग्राहकांच्या खिशावर पुन्हा ताण वाढणार?

पुन्हा रेपो रेट वाढणार का? ईएमआयचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:38 AM2022-08-03T11:38:08+5:302022-08-03T11:38:32+5:30

पुन्हा रेपो रेट वाढणार का? ईएमआयचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष.

rbi policy repo rate could hike 25 to 35 basis points hike know the reasons what expert says us federal | RBI Policy Rate: RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरूवात, ग्राहकांच्या खिशावर पुन्हा ताण वाढणार?

RBI Policy Rate: RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरूवात, ग्राहकांच्या खिशावर पुन्हा ताण वाढणार?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) तीन दिवसीय द्विमासिक बैठक आजपासून (३ ऑगस्ट) सुरू झाली आहे. या बैठकीतील निर्णयांची माहिती (RBI Meeting Updates) रिझर्व्ह बँक 5 ऑगस्ट रोजी मांडणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुन्हा रेपो दरात (Repo Rates) वाढ होणार की रेपो दर जैसे थे राहणार, हे या बैठकीतून स्पष्ट होणार आहे. चलनवाढीचा सध्याचा स्तर जगभरातील मध्यवर्ती बँकांवर व्याजदर वाढवण्यासाठी दबाव आणत असल्याचंही दिसून येत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्स आणि त्यानंतर जूनमध्ये ५० बेसिस पॉईंटची अशी एकूण ९० बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती. त्याच वेळी, यूएस फेडरल रिझर्व्हने महागाईचा सामना करण्यासाठी २२५ बेसिस पॉईंटने आपले दर वाढवले​​. त्या तुलनेत भारतीय रिझर्व्ह बँकेनं ९० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ?
५ ऑगस्ट रोजी पतधोरण समिती रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ करेल. सोबतच हळूहळू रिझर्व्ह बँक आपली भूमिका कठोरही करेल असं बोफा ग्लोबल रिसर्चच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे बँक ऑफ बडोदाच्या एका रिपोर्टमध्ये फेडरल रिझर्व्हनं व्याज दरात २.२५ टक्क्यांची वाढ केली आहे, अशातच रिझर्व्ह बँकही ठरलेल्या वेळेच्या पूर्वीच रेपो दरात वाढ करू शकते असं म्हटलं आहे. परंतु भारतातील सध्याची परिस्थिती पाहता कठोर भूमिका घेण्याचीही गरज नसल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Web Title: rbi policy repo rate could hike 25 to 35 basis points hike know the reasons what expert says us federal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.