Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स

उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स

कंपनीचा आयपीओ उघडल्यानंतर काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. कंपनीचा आयपीओ १ डिसेंबरला बोली लावण्यासाठी उघडला आहे आणि दुपारी १ वाजेपर्यंत ५ पटीपेक्षा जास्त सबस्क्राइब झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:59 IST2025-12-01T14:59:34+5:302025-12-01T14:59:34+5:30

कंपनीचा आयपीओ उघडल्यानंतर काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. कंपनीचा आयपीओ १ डिसेंबरला बोली लावण्यासाठी उघडला आहे आणि दुपारी १ वाजेपर्यंत ५ पटीपेक्षा जास्त सबस्क्राइब झाला.

Ravelcare IPO was fully booked as soon as it opened Possibility of bumper listing on grey market premium see details | उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स

उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स

रेवेलकेअरच्या (Ravelcare) आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कंपनीचा आयपीओ उघडल्यानंतर काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. कंपनीचा आयपीओ १ डिसेंबरला बोली लावण्यासाठी उघडला आहे आणि दुपारी १ वाजेपर्यंत ५ पटीपेक्षा जास्त सबस्क्राइब झाला. हा आयपीओ ३ डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील.

रेवेलकेअरचे शेअर्स आत्तापासूनच ग्रे मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ४०% च्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.

₹१८० च्या वर लिस्ट होऊ शकतात शेअर्स

रेवेलकेअरच्या आयपीओमध्ये शेअरचा किंमत बँड १३० रुपये आहे. तर, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स सध्या ५२ रुपयांच्या प्रीमियमसह व्यवहार करत आहेत. सध्याच्या ग्रे मार्केट प्रीमियमनुसार (GMP) पाहिलं, तर रेवेलकेअरचे शेअर्स बाजारात १८२ रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, आयपीओमध्ये ज्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स अलॉट होतील, ते लिस्टिंगच्या दिवशी ४० टक्क्यांहून अधिक फायद्याची अपेक्षा करू शकतात. रेवेलकेअरचे शेअर्स सोमवार, ८ डिसेंबर रोजी बाजारात लिस्ट होऊ शकतात.

एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर

कंपनी काय करते?

रेवेलकेअर लिमिटेडची सुरुवात नोव्हेंबर २०१८ मध्ये झाली. रेवेलकेअर हा एक डिजिटल फर्स्ट ब्युटी आणि पर्सनल केअर ब्रँड आहे, जो हेअरकेअर, स्किनकेअर आणि बॉडीकेअर उत्पादनांची विस्तृत श्रेणी ऑफर करतो. कंपनी तिच्या वेबसाइट तसेच Amazon, Flipkart, Blinkit, Myntra सारख्या मार्केटप्लेसेसद्वारे आपलं कामकाज चालवते. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रेवेलकेअरनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश केला. ही कंपनी यूएई, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये ग्राहकांना उत्पादनं विकते.

आयपीओवर ५ पटीहून अधिक बोली

रेवेलकेअरचा आयपीओ (Ravelcare IPO) पहिल्याच दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत ५.१० पट सबस्क्राइब झाला आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांचा (Retail Investors) कोटा ५.८० पट सबस्क्राइब झालाय.

नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांच्या कॅटेगरीत ५.५७ पट बोली लावण्यात आलीये.

क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) कॅटेगरीत ३.५२ पट सबस्क्रिप्शन मिळालंय.

रेवेलकेअरच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदार २ लॉटसाठी बोली लावू शकतात. आयपीओच्या २ लॉटमध्ये २००० शेअर्स आहेत. म्हणजेच, सामान्य गुंतवणूकदारांना २ लॉटसाठी २.६० लाख रुपये गुंतवावे लागतील.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : रेवेलकेयर आईपीओ पूरी तरह सब्सक्राइब; ग्रे मार्केट प्रीमियम से बंपर लिस्टिंग की उम्मीद

Web Summary : रेवेलकेयर आईपीओ को निवेशकों की अच्छी प्रतिक्रिया मिली, कुछ ही घंटों में पूरी तरह सब्सक्राइब हो गया। शेयर ग्रे मार्केट में 40% प्रीमियम पर कारोबार कर रहे हैं, संभावित रूप से ₹182 पर लिस्टिंग हो सकती है। आईपीओ पहले दिन 5.10 गुना सब्सक्राइब हुआ। रेवेलकेयर अंतरराष्ट्रीय स्तर पर सौंदर्य और व्यक्तिगत देखभाल उत्पाद बेचती है।

Web Title : Ravelcare IPO Fully Subscribed; Bumper Listing Expected Based on Premium

Web Summary : Ravelcare IPO saw strong investor response, fully subscribed within hours. Shares trade at a 40% premium in the grey market, potentially listing at ₹182. The IPO was subscribed 5.10 times on its first day. Ravelcare sells beauty and personal care products internationally.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.