Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Investment For Kids: मूल वाढवणं झालं महाग! पती-पत्नी दोघं कमावते असूनही ओढाताण; काय करावं?

Investment For Kids: मूल वाढवणं झालं महाग! पती-पत्नी दोघं कमावते असूनही ओढाताण; काय करावं?

भारतातील वाढत्या महागाईचा फटका आता कुटुंबांना बसू लागला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये मुलांचे संगोपन करणे ही आता केवळ जबाबदारी न राहता, ती एक मोठी आर्थिक गुंतवणूक ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 14:24 IST2026-04-20T14:21:49+5:302026-04-20T14:24:11+5:30

भारतातील वाढत्या महागाईचा फटका आता कुटुंबांना बसू लागला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये मुलांचे संगोपन करणे ही आता केवळ जबाबदारी न राहता, ती एक मोठी आर्थिक गुंतवणूक ठरत आहे.

Raising a child has become expensive! Even though both husband and wife earn, they are struggling; what to do? | Investment For Kids: मूल वाढवणं झालं महाग! पती-पत्नी दोघं कमावते असूनही ओढाताण; काय करावं?

Investment For Kids: मूल वाढवणं झालं महाग! पती-पत्नी दोघं कमावते असूनही ओढाताण; काय करावं?

भारतातील वाढत्या महागाईचा फटका आता कुटुंबांना बसू लागला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये मुलांचे संगोपन करणे ही आता केवळ जबाबदारी न राहता, ती एक मोठी आर्थिक गुंतवणूक ठरत आहे. शिक्षण, आरोग्य, निवास आणि जीवनशैलीतील बदल यामुळे संगोपनाचा खर्च पूर्वीच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, योग्य आर्थिक नियोजनाशिवाय ‘पालकत्व’ ही एक कठीण कसरत ठरत आहे.

शिक्षणाचा खर्च

शहरांमध्ये मुलांना वाढवताना पालकांसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे शिक्षणाचे. शाळांची वार्षिक फी दरवर्षी १० ते १५ टक्क्यांनी वाढत आहे. केवळ शालेय शुल्कच नव्हे, तर अवांतर उपक्रम, खासगी शिकवण्या आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा खर्च पालकांच्या खिशाला मोठी कात्री लावत आहे. उच्च शिक्षणासाठी लागणारा निधी तर आता कोटींच्या घरात जात आहे.

दैनंदिन खर्च

मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत. लसीकरण, नियमित तपासण्या आणि अचानक येणारी वैद्यकीय संकटे यासाठी मोठा खर्च होतो. आरोग्य विम्याने काही प्रमाणात आधार मिळत असला तरी अनेक खर्च पालकांना स्वतःच्या खिशातूनच करावे लागतात. यासोबतच सकस आहार, कपडे आणि वीजबिलांसारखे दैनंदिन खर्चही सातत्याने वाढत आहेत.

राहणीमान दर्जा

चांगल्या शाळांच्या जवळ घर घेण्यासाठी अधिक भाडे किंवा मोठ्या रकमेचा ‘ईएमआय’ भरावा लागतो. सुरक्षित परिसर आणि सुविधा यांसाठी घरावरील खर्च हा कुटुंबाच्या बजेटमधील सर्वात मोठा हिस्सा व्यापत आहे. याशिवाय, सुट्ट्यांमध्ये फिरणे किंवा मनोरंजनासाठी होणारा खर्चही आता अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. त्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी लागते.

करिअर तडजोड

अनेकांना मुलांच्या संगोपनासाठी करिअरमध्ये तडजोड करावी लागते. दोघांचीही नोकरी सुरू ठेवायची असेल, तर पाळणाघराचा मोठा खर्च सोसावा लागतो. पालकांना किती मुले असावीत, हा पूर्णपणे खासगी आणि वैयक्तिक निर्णय आहे. तरीही, आजच्या वाढत्या महागाईच्या काळात, हा निर्णय घेताना 'आर्थिक क्षमता' हा एक कळीचा मुद्दा ठरत आहे. 

वयानुसार मुलांच्या खर्चाचे नियोजन

मुलाचे वयमासिक खर्च (अंदाज)सुचवलेली गुंतवणूक (मासिक)मुख्य लक्ष
०-५ वर्षे५,००० - ७,०००५,००० (अॅग्रेसिव्ह एसआयपी)उच्च शिक्षण
६-१० वर्षे८,००० - १०,०००५,००० (एसआयपी)शालेय गरजा
११-१५ वर्षे१२,००० - १५,०००३,००० (सेफ इक्विटी)ग्रॅज्युएशन
१६-२२ वर्षे२०,०००+गुंतवणुकीतून पैसे काढणेकरिअर सेटलमेंट


पालकांनो ही चेकलिस्ट केली आहे का?

- मुलाचा जन्म होताच टर्म इन्शुरन्स वाढवला आहे का? 
- उच्च शिक्षणासाठी 'एसआयपी' सुरू केली आहे का?
- आपत्कालीन निधी तयार आहे का?
- मुलांच्या नावे वेगळे पीपीएफ खाते उघडले आहे का?

Web Title : बच्चे पालना हुआ महंगा, दोहरी आय वाले परिवार भी परेशान: समाधान ज़रूरी।

Web Summary : शिक्षा, स्वास्थ्य और जीवनशैली के बढ़ते खर्चों के कारण बच्चे पालना एक बड़ी वित्तीय चुनौती बन गया है। बीमा और एसआईपी निवेश सहित रणनीतिक योजना, माता-पिता के लिए बढ़ते खर्चों का प्रबंधन करने और अपने बच्चों का भविष्य सुरक्षित करने के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : Child-rearing costs soar, straining dual-income families: Solutions needed.

Web Summary : Rising education, healthcare, and lifestyle expenses make child-rearing a significant financial challenge. Strategic planning, including insurance and SIP investments, is crucial for parents to manage escalating costs and secure their children's future.